Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे नूतनीकृत 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहा'चे लोकार्पण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे नूतनीकृत 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहा'चे लोकार्पण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे नूतनीकृत 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहा'चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या नाट्यगृहामध्ये काही मूलभूत सुविधांची आवश्यकता होती.

मंचाची क्षमता वाढविणे, नाट्यकर्मींसाठी आवश्यक खोल्यांची उपलब्धता करणे अशा विविध कामांमुळे आता हे नाट्यगृह अधिक सक्षम झाले आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे नूतनीकृत 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहा'चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या नाट्यगृहामध्ये काही मूलभूत सुविधांची आवश्यकता होती. मंचाची क्षमता वाढविणे, नाट्यकर्मींसाठी आवश्यक खोल्यांची उपलब्धता करणे अशा विविध कामांमुळे आता हे नाट्यगृह अधिक सक्षम झाले आहे. त्यामुळे दर्जेदार नाटके, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कला, साहित्य आणि संस्कृतीचे विविध आविष्कार या नाट्यगृहाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे सादर करता येतील. या नाट्यगृहाला साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे अत्यंत समर्पक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून काल्पनिकतेपेक्षा वास्तविकतेचे भान आपल्यासमोर मांडले. त्या काळातील संस्कृती, सामाजिक परिस्थिती, संघर्षमय जीवन आणि त्या संघर्षातून घडणारा समाज यांचे प्रतिबिंब त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये दिसून येते. समाजातील अन्याय, त्या अन्यायाविरुद्ध उभे राहणारे नायक आणि संघर्ष करणारी पात्रे यांचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या साहित्यामधून केले. विशेषतः कामगारांच्या जीवनातील संघर्ष त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

मानवी मनातील संवेदना अत्यंत प्रभावी आणि हळुवारपणे व्यक्त करण्याची विलक्षण क्षमता साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत होती. साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात अण्णाभाऊ यांनी आपला ठसा उमटविला. जे भोगायला मिळाले त्याला आपल्या शब्दांची ढाल देत साहित्याच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तरुणांना प्रेरणा दिली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गीते अन्यायाविरुद्ध जनतेचा आवाज बनली. केवळ साहित्य नव्हे तर त्या साहित्यातून अंगार फुलवणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊ यांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविली. जगातील अनेक प्रगत देशांच्या भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले आहेत. यावरून त्यांच्या साहित्याची धार आणि प्रभाव किती व्यापक होता हे अधोरेखित होते. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नाट्यगृह उभारले जाणे म्हणजे त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी केलेली एक समर्पित कृती असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

या नाट्यगृहाच्या माध्यमातून साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार अनंत काळापर्यंत समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम व्हावे. अण्णाभाऊ हे वंचित, शोषित आणि सर्वसामान्य समाजाचा आवाज होते. त्यामुळे हे नाट्यगृह समाजातील शेवटच्या घटकासाठीही सहज उपलब्ध होईल, अशा पद्धतीने त्याचे नियोजन करावे. तसेच सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने भाडे निश्चित करून अभिजात कला, साहित्य आणि संस्कृतीला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अमीत साटम, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Tukaram Mundhe : खासगी हॉटेलचे परवाने रद्द, मग मंत्रालय कँटीनचे का नाही? FDA अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलं

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra