काँग्रेसच्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवर बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. "कुंभमेळ्यासाठी खर्च होणारा पैसा मुख्यमंत्र्यांच्या घरचा नाही, तो जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा कसा आणि कुठे खर्च होतो, हे जनतेला समजले पाहिजे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाशिकच्या जनतेला विश्वासात घेऊन विकासकामे झाली पाहिजेत. कुंभमेळ्यानंतरही ही विकासकामे उपयोगी ठरली पाहिजेत, मात्र खर्चाबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे, असेही चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची आपल्याला कीव येते, अशी टीकाही त्यांनी केली. उत्तराखंडमधील राहुल गांधी यांच्याशी संबंधित प्रकारावर बोलताना त्यांनी या घटनेचा निषेध केला. पूजा आणि स्वच्छतेच्या नावाखाली असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या घटनेवरही चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले. महामार्गावर पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे, किरकोळ दुकाने आणि इतर जनसुविधा असणे आवश्यक असताना त्या उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री हे गृहमंत्रीही असल्याने त्यांनी महिला आणि बालकांवरील अत्याचार तसेच शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना, सरकारने दिलेली आश्वासने पाळली की मोडली, हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत, याचा अर्थ सरकारने कुठेतरी त्यांची दिशाभूल केली असावी, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन तारखेला दौरा नियोजित असला तरी राहुल गांधी उद्याही येऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.
Devendra Fadnavis : 'छात्रों की गूंज' नाही 'झूंठ की गूंज' आहे, फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा व्हिडिओ, सोनं खरेदी आणि परदेश प्रवासाबाबत जनतेला केलं मोठं आवाहनकाँग्रेसच्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवर बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. "कुंभमेळ्यासाठी खर्च होणारा पैसा मुख्यमंत्र्यांच्या घरचा नाही, तो जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा कसा आणि कुठे खर्च होतो, हे जनतेला समजले पाहिजे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

