Dailyhunt
मुंबई महानगरपालिकेचा शहरात आधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क बसवण्याचा मोठा निर्णय

मुंबई महानगरपालिकेचा शहरात आधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क बसवण्याचा मोठा निर्णय

मुंबई महानगरपालिकेने शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीद्वारे शहरातील संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष ठेवता येणार आहे आणि आपत्कालीन परिस्थितींवर जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीद्वारे शहरातील संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष ठेवता येणार आहे आणि आपत्कालीन परिस्थितींवर जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. माहितीनुसार, सध्याच्या शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये टप्प्याटप्याने सुधारणा केली जाणार आहे. नव्या कॅमेर्‍यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित व्हिडिओ अॅनालिटिक्स प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे रिअल-टाइममध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल, आपत्कालीन घटना किंवा शहरातील नियमभंग ओळखता येईल. उदाहरणार्थ, आग, धूर, पडलेली झाडे, पाणी साचणे, बेकायदेशीर कचरा टाकणे, अतिक्रमण यासारख्या घटनांवर त्वरित लक्ष ठेवले जाईल आणि संबंधित विभागांना सूचना पाठवली जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra