Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार; विशेष पुस्तकाचे प्रकाशन

मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार; विशेष पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास आणि पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळातील प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या 'मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास' या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या मुंबई पोलीस क्लबमधील 'प्रेरणा सभागृह' येथे दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळातील विविध आव्हाने, निर्णय आणि पोलीस दलाच्या कौतुकास्पद कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचा मागोवा घेणारे हे पुस्तक प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरले आहे. यात एकूण ४८ आयुक्तांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकताना ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेगारी क्षेत्राचे अभ्यासक प्रभाकर पवार यांनी २५ पोलीस आयुक्तांच्या कारकिर्दीचा विशेष आढावा घेताना त्यांची कार्यपद्धती, मुंबईकरांसाठी योगदान, पोलीस दलातील निर्णय यावर प्रकाश टाकला आहे. या अभ्यासपूर्ण लिखाणातून दगडी भिंतीच्या आतील पोलीस आयुक्तालय समजून घेण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.

या सोहळ्याला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रमुखांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग तसेच मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलाचा भूतकाळ आणि वर्तमान यांचा अनोखा मेळ व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. माजी आयुक्त एम. एन. सिंग आणि विद्यमान आयुक्त देवेन भारती यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आयोजकांकडून या सोहळ्यास सर्व नागरिक, पत्रकार आणि पोलीस दलातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन 'पप्पू-प्राची प्रकाशन'तर्फे करण्यात आले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

मुख्यमंत्र्यांकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक; अशा धडक कारवाया पुढेदेखील चालू राहणार

मुंबई पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास आणि पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळातील प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या 'मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास' या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या मुंबई पोलीस क्लबमधील 'प्रेरणा सभागृह' येथे दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra