Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईतील जोगेश्वरीत हिट अँड रन प्रकरण! डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू

मुंबईतील जोगेश्वरीत हिट अँड रन प्रकरण! डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात रात्री १.२० वाजण्याच्या सुमारास एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. हिट अँड रनच्या प्रकरणात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून तो डिलिव्हरी बॉय असल्याचे समजते आहे.

एका भरधाव टँकरने या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि दुचाकी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही दुर्दैवी घटना जोगेश्वरी पश्चिमेतील अमृत नगर परिसरात घडली. अमृत नगर भागातील अजित ग्लास गार्डनच्या गेटसमोर हर्ष नावाचा डिलिव्हरी बॉय दुचाकीवर असताना भरधाव येणाऱ्या टँकरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्ष याचा जागीच मृत्यू झाला. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातानंतर टँकर चालक तेथून पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु नागरिकांच्या तत्परतेने त्याला पकडण्यात आले. अमृत नगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी टँकर चालकाचा पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, टँकर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून वर्तवला जात आहे. या घटनेने परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळाल्यावर ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली. तसेच हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. यासंदर्भात ओशिवरा पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणातील पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईतील घटनेनंतर ठाणे महापालिका अलर्ट! २ लाख मॅनहोलच्या तपासणीला सुरुवात

हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात रात्री १.२० वाजण्याच्या सुमारास एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. हिट अँड रनच्या प्रकरणात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून तो डिलिव्हरी बॉय असल्याचे समजते आहे. एका भरधाव टँकरने या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि दुचाकी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra