Dailyhunt
Nagpur Crime : पैशासाठी शेजाऱ्यानेच केली १४ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, आरोपींना अटक

Nagpur Crime : पैशासाठी शेजाऱ्यानेच केली १४ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, आरोपींना अटक

नागपूर येथे १४ वर्षीय अथर्व ननोरेच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पैशांच्या हव्यासापोटी ओळखीच्या शेजाऱ्याने मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर येथे घडलेल्या अथर्व ननोरे अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, या गुन्ह्यामागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी, ओळखीच्याच शेजाऱ्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून १४ वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना हनुमान जयंतीच्या दिवशी घडली. त्या दिवशी गिट्टीखदान परिसरात मोठ्या उत्साहात शोभायात्रा निघाली होती. अथर्व ननोरे हा देखील या मिरवणुकीत स्वयंसेवक म्हणून सहभागी झाला होता. गर्दीचा फायदा घेत आरोपींनी त्याचे अपहरण केले. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न पोहोचल्याने पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना अथर्वच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय आला. चौकशीत समोर आले की, आरोपीला अथर्वच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती होती आणि मोठी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने त्याने हा कट रचला होता. त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने अथर्वचे अपहरण केले आणि त्याला लपवून ठेवले. मात्र, अथर्व शुद्धीवर असल्याने तो ओरडेल किंवा ओळख पटवेल या भीतीने आरोपी घाबरले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra