नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली माता-बाल रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी निलंबित केले आहे.
या घटनेनंतर मनसेसह विविध राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. ऐरोली माता-बाल रुग्णालयात आठ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांना उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या घटनेत सोनम डोंगरे आणि त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला अद्याप उपचार घेत आहे.
या घटनेनंतर मनसेचे नेते गजानन काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. विविध पक्षांच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या घटनेनंतर वर्षभरापूर्वी वाशी महापालिका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या गर्भवती संगीता खरात यांच्या प्रकरणाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ऐरोली येथील महापालिका रुग्णालयात गर्भवती सोनम डोंगरे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर मृत संगीता खरात यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. वर्षभरापूर्वी वाशी महापालिका रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे संगीता खरात यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्या प्रकरणातील दोषींवर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, तसेच कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदतही देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता सोनम डोंगरे प्रकरणातही अशीच निष्काळजीपणा होऊ नये, दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी संगीता खरात यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज
हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली माता-बाल रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी निलंबित केले आहे. या घटनेनंतर मनसेसह विविध राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. ऐरोली माता-बाल रुग्णालयात आठ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांना उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या घटनेत सोनम डोंगरे आणि त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला अद्याप उपचार घेत आहे.

