शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून शिंदेंचे वकील युक्तिवाद मांडणार आहेत.
याबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, ' ही एक ऐतिहासिक घटना सुरू आहे. देशात संविधानाचं महत्त्व राहणार आहे का? देशामध्ये पक्षांतरांना न्यायालय आणि निवडणूक आयोग अशा प्रकारे मोकळं रान देणार आहेत का? यावर फार मोठं चिंतन न्यायालयात सुरू आहे.'
'गेल्या तीन वर्षांत निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्षाच्या, विशेषतः अमित शहांच्या दबावाखाली निर्णय घेतले. अंतिम लढाई सुरू आहे. आता नाही तर कधीच नाही. शिवसेनेच्या वतीने आम्हाला जे म्हणणं मांडायचं होतं, ते आम्ही पूर्णपणे मांडलं आहे. कपिल सिब्बल आणि कामत यांनी अत्यंत धुवांधार पद्धतीने यापूर्वीच्या निवडणूक आयोगाच्या, विधानसभा अध्यक्षांच्या आणि राज्यपालांच्या बेकायदेशीर निर्णयांची चिरफाड केली आहे. आता सात ते आठ दिवस युक्तिवाद चालेल. दोन्ही बाजू आपापली भूमिका मांडतील. शेवटी घटनापीठाला घटनात्मक चौकटीत राहून निर्णय द्यावा लागेल. कोणत्याही दबावाखाली हा निर्णय होणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. देशाला एक ऐतिहासिक आणि स्वच्छ निर्णय मिळेल आणि भविष्यातील पक्षांतरांना आळा बसेल, असा निकाल आम्हाला अपेक्षित आहे.'
'कोणी दिल्लीला गेले असेल, कॅबिनेटची बैठक सोडून वारंवार उपमुख्यमंत्री बाहेर जात असतील, तर राज्यात महत्त्वाचे प्रश्न असताना ते दिल्लीला जाऊन काय करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आदिवासी रस्त्यावर आले आहेत, मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान उभं केलं आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी दिल्लीला जाण्याची गरज काय? शेवटी न्यायालयात संविधानाच्या बाजूने निकाल लागेल आणि संविधानाचा विजय होईल, अशी आम्हाला खात्री आहे.'
Devendra Fadnavis : 'छात्रों की गूंज' नाही 'झूंठ की गूंज' आहे, फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा व्हिडिओ, सोनं खरेदी आणि परदेश प्रवासाबाबत जनतेला केलं मोठं आवाहनशिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून शिंदेंचे वकील युक्तिवाद मांडणार आहेत. याबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, ' ही एक ऐतिहासिक घटना सुरू आहे. देशात संविधानाचं महत्त्व राहणार आहे का? देशामध्ये पक्षांतरांना न्यायालय आणि निवडणूक आयोग अशा प्रकारे मोकळं रान देणार आहेत का? यावर फार मोठं चिंतन न्यायालयात सुरू आहे.'

