Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PF काढणे झाले सोपे! EPFO च्या नव्या नियमांचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

PF काढणे झाले सोपे! EPFO च्या नव्या नियमांचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

EPFO ने पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पीएफची रक्कम लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, डिजिटल सुविधांमुळे पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दर महिन्याला पगारातून कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमधील पैसे आता गरजेच्या वेळी अधिक सहजपणे काढता येणार आहेत. यापूर्वी पीएफ क्लेम करण्याची प्रक्रिया काहीशी वेळखाऊ आणि किचकट होती. मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने ऑनलाइन प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत.

नवीन व्यवस्थेमुळे पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक जलद झाली आहे. आता ऑनलाइन क्लेम केल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे आजारपण, शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा इतर आर्थिक गरजांच्या वेळी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ईपीएफओच्या नव्या प्रणालीमध्ये अनेक क्लेम आता ऑटो-सेटल होत आहेत. म्हणजेच अर्जातील माहिती योग्य असल्यास मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या कमी झाली असून, कर्मचाऱ्यांना कमी वेळेत पैसे मिळत आहेत. याशिवाय पीएफ क्लेम प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी ईपीएफओकडून डिजिटल सुविधांवर भर दिला जात आहे.

भविष्यात BHIM ॲप आणि UPI प्रणालीच्या माध्यमातून पीएफची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे पैसे मिळण्याची प्रक्रिया आणखी वेगवान होणार आहे. दरम्यान, पीएफवरील व्याजाबाबतही कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. सध्या पीएफ खात्यावर ८.२५ टक्के व्याजदर दिला जात आहे. ईपीएफओने कोट्यवधी खातेधारकांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजाची रक्कम जमा केली आहे. येत्या काळात पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी होणार असल्याने लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.

Aamir Khan : सलमान खाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? सोशल मीडियावर खळबळ

Uddhav Thackeray : पेपरफुटीवरून उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावलं, अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra