Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News : प्रवाशांना मोठा दिलासा! गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणासाठी धावणार १० विशेष ट्रेन, वेळापत्रक जाहीर

Pune News : प्रवाशांना मोठा दिलासा! गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणासाठी धावणार १० विशेष ट्रेन, वेळापत्रक जाहीर

णेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-रत्नागिरी मार्गावर १० विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. एसी आणि मिश्र अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी बाप्पाच्या आगमनाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर मोठी गर्दी होत असल्याने यंदा मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या २४६ विशेष गाड्यांपैकी पुणे ते रत्नागिरी दरम्यान १० विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये ४ पूर्ण वातानुकूलित (AC) विशेष गाड्या आणि ६ एसी, स्लीपर तसेच जनरल डब्यांचा समावेश असलेल्या मिश्र गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

एसी साप्ताहिक विशेष गाड्या १५ आणि २२ सप्टेंबर रोजी धावतील, तर मिश्र विशेष गाड्या १२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी प्रवाशांच्या सेवेत असतील. या सर्व गाड्या पुणे स्थानकातून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचतील. परतीच्या प्रवासात या गाड्या रत्नागिरीहून सायंकाळी ५.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता पुण्यात दाखल होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांना चिंचवड, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड आणि इतर स्थानकांमार्गे या गाड्या रत्नागिरीपर्यंत धावणार आहेत.

याशिवाय मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनही सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदा एकूण २४६ विशेष गाड्यांमध्ये १८४ आरक्षित आणि ६२ अनारक्षित गाड्यांचा समावेश असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी यंदाचा गणेशोत्सवाचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि कन्फर्म तिकीट मिळण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून नाशकात राजकारण तापलं; दोन सेना आमनेसामने

17 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना कोर्टाचे आदेश

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra