राज ठाकरेंना कमबॅक करण्याची हीच सर्वात उत्तम वेळ आहे का.. ही चर्चा यासाठी सुरू झाली आहे कारण... ३५ वर्षे भक्कम असलेल्या भाजपच्या किल्ल्याला प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावला आहे. बिहारच्या बांकीपूरमधून प्रशांत किशोर विजयी झाले.
हा विजय आपल्याला साधा जरी वाटत असेल, तरी हा विजय एका राजकीय भूकंपापेक्षा कमी नाही. कारण या जागेवरून जे निवडून यायचे, ते भाजपचे साधारण नेते नाहीत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन होते. कॉन्फिडन्स एवढा होता की, जर कुत्र्यांना किंवा मांजरांना जरी येथून तिकीट दिलं, तरी ते जिंकून येतील. अशी धारणा भाजपची होती
राज ठाकरेंना कमबॅक करण्याची हीच सर्वात उत्तम वेळ आहे का.. ही चर्चा यासाठी सुरू झाली आहे कारण… ३५ वर्षे भक्कम असलेल्या भाजपच्या किल्ल्याला प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावला आहे. बिहारच्या बांकीपूरमधून प्रशांत किशोर विजयी झाले. हा विजय आपल्याला साधा जरी वाटत असेल, तरी हा विजय एका राजकीय भूकंपापेक्षा कमी नाही. कारण या जागेवरून जे निवडून यायचे, ते भाजपचे साधारण नेते नाहीत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन होते. कॉन्फिडन्स एवढा होता की, जर कुत्र्यांना किंवा मांजरांना जरी येथून तिकीट दिलं, तरी ते जिंकून येतील. अशी धारणा भाजपची होती. पण प्रशांत किशोर, ज्याला बिहारने विधानसभा निवडणुकीत जमिनीवर आदळलं… त्याच प्रशांतने बिहारला दाखवून दिलं… "मैं समंदर हूँ, लौट कर ज़रूर आऊँगा…" पण महाराष्ट्रातही एक समुद्र असा आहे… ज्याच्या उफाळण्याची चर्चा होत असते, ते म्हणजे राज ठाकरे… प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे विरोधी पक्षाला नवसंजीवनी मिळाली, असं चित्र दिसत आहे… कारण एक कॉन्फिडन्स आलाय की, भाजपलाही माती चारली जाऊ शकते.
राज ठाकरेंना कमबॅकसाठी हीच योग्य वेळ आहे, असं का म्हटलं जात आहे. याचं कारण गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घटना आहेत. सर्वात आधी म्हणजे तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी रचलेला इतिहास. थलपती विजय पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले व थेट मुख्यमंत्री झाले. त्यांच्या विजयाने एक मेसेज गेला, जर तुमच्या सभांना गर्दी होत असेल, तर त्या गर्दीचं रूपांतर मतदानातही होऊ शकतं.. राज ठाकरेंच्या सभेला किती गर्दी, किती उत्साह आणि किती जल्लोष असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता फक्त या गर्दीचं रूपांतर राज ठाकरेंना मतदानात करायचं आहे.त्यानंतर दुसरी मोठी घडामोड म्हणजे राज ठाकरेंच्या गडामध्ये, म्हणजे मुंबईमध्ये, मराठी माणसांवर होत असलेला अन्याय. मुंबई महानगरपालिका भाजपकडे गेल्यापासून मराठी माणसांवर अन्याय होतोय, अशी भावना बहुदा समोर येते. याचं उदाहरण म्हणजे जैन मुनी आणि मराठी माणसांचा पांढऱ्या पट्ट्यांवरून झालेला वाद. या वादात राज ठाकरे व मनसेने उघडपणे मराठी माणसांच्या बाजूने राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मराठी मतदारांना राज ठाकरे दूर होऊ देणार नाहीत, याची काळजी ते घेताना दिसत आहेत. शिवाय यंदा पावसामुळे झाडं पडून मुंबईकरांचा जीव गेला. त्यावरही राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली.
यानंतर येतो सर्वात मोठा मुद्दा, ज्यावर राज ठाकरे लक्ष केंद्रित करत आहेत व जर त्या गटाचं ते मन वळवू शकले, तर नक्कीच ठाकरेंसाठी येणारी निवडणूक ही कमबॅकची ठरेल. तो गट म्हणजे जेन-झी… जेन-झी… कशा प्रकारे रस्त्यावर उतरतात, हे सगळ्यांनी पाहिलं. हे जेन-झी कोणत्याही पक्षाचे पारंपरिक मतदार नाहीत. काही जेन-झी तर पहिल्यांदाच मतदान करतील. त्यामुळे हा व्होटबँक म्हणजे नो-बॉलवर फ्री-हिटसारखा आहे. फक्त त्याचा फायदा उचलता यायला हवा.कारण हे जेन-झी भाजपवर अत्यंत नाराज आहेत. त्यांच्यावर दिल्लीत लाठीचार्ज तर झालाच, पण भाजप आयटी सेलकडून त्यांना इंटरनेटवर शिव्या देखील पडत आहेत. अशावेळी राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे आहेत, असा विश्वास त्यांना जाणवला, तर हे जेन-झी मनसेकडे वळू शकतात. राज ठाकरे यांनी जेन-झीला सोबत घेण्याची सुरुवात देखील केली आहे. सोनम वांगचुकला पाठिंबा असो की अमित ठाकरेंना दिल्लीत अभिजीत दीपकेला पाठवलं असो. राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. एवढंच नाही, तर मुंबईत देखील विद्यार्थ्यांसाठी तिरंगा यात्रा काढली. व रॅलीत जर विद्यार्थ्यांसोबत दिल्लीसारखं घडलं, तर फटकवणार, असा दम देखील राज ठाकरेंनी दिला.
यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकारला नडले, त्यांचा सन्मान देखील केला. त्यामुळे राज ठाकरे यांनी जेन-झीला आपल्याकडे वळवण्याची सुरुवात केली आहे.याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे राममंदिर दानचोरी व त्याच्यापाठोपाठ सिद्धीविनायक मंदिर, मुंबईतील दानचोरी. याच्यातही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत या सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळे भाजपवर नाराज असलेला मतदार देखील राज ठाकरे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.अशातच प्रशांत किशोर यांचा भाजपच्या गडात ऐतिहासिक विजय म्हणजे… विरोधकांना मिळालेली नवसंजीवनीच… जर आपण योग्य मेहनत घेतली आणि त्यापेक्षा मैदान सोडलं नाही, तर भाजपलाही त्याच्या गडामध्ये पाणी पाजू शकतो… हा कॉन्फिडन्स आता सर्व विरोधकांना आला आहे… पण फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे… शेवटपर्यंत मैदान सोडायचं नाही..
अभिजित दिपके यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणरा, नेमकं प्रकरण काय ?PF काढणे झाले सोपे! EPFO च्या नव्या नियमांचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

