राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरतीसाठी मोठी तयारी सुरू झाली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिल्याची आनंदाची माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये प्राध्यापकांसह ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक (पीटी डायरेक्टर) या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत
राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरतीसाठी मोठी तयारी सुरू झाली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिल्याची आनंदाची माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्राध्यापकांसह ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक (पीटी डायरेक्टर) या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत.
राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये अनेक प्राध्यापक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे शैक्षणिक कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. राज्यातील पात्र उमेदवार अनेक वर्षांपासून भरतीची वाट पाहत होते. मागील काही काळात उमेदवारांकडून आणि शिक्षक संघटनांकडून याबाबत अनेक मागण्या आणि आंदोलनही झाले आहेत. सुप्रसिद्ध नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या जागा लवकरच भरल्या जातील. ही गेल्या २०-२५ वर्षातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. त्यांनी सांगितले की, राज्यभरातील ७०० प्राध्यापक पदांची भरती विद्यापीठांमध्ये केली जाणार असून, अनुदानित महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरतीस मान्यता मिळाली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra