Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रक्तदान आणि शाळेचे साहित्य वाटप, एक ईद अशी देखील..

रक्तदान आणि शाळेचे साहित्य वाटप, एक ईद अशी देखील..

स्लामध्ये असं स्पष्टपणे सांगीतलं आहे की आपण ज्या देशात ज्या भागात राहाल त्या भागाचे नियम व कायद्यांचे पालण करणे हे ही मुस्लीमांच कर्तव्य आहे. तरी देखील प्रशासनाच्या नियमांना श्रद्देच नाव देऊन केराची टोपली दाखवली जाते.

या सर्वांमध्ये मुस्लीम सामाजती काही पुरोगामे सामाजीक कार्यकर्ते आहेत जे पशुबळी न करता सामाजीक कार्यातून इद साजरी करतात.

इस्लामध्ये असं स्पष्टपणे सांगीतलं आहे की आपण ज्या देशात ज्या भागात राहाल त्या भागाचे नियम व कायद्यांचे पालण करणे हे ही मुस्लीमांच कर्तव्य आहे. तरी देखील प्रशासनाच्या नियमांना श्रद्देच नाव देऊन केराची टोपली दाखवली जाते. या सर्वांमध्ये मुस्लीम सामाजती काही पुरोगामे सामाजीक कार्यकर्ते आहेत जे पशुबळी न करता सामाजीक कार्यातून इद साजरी करतात.

https://youtu.be/3y5oaCGZlFM?si=IL29RgkgZkh0N1A5

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी हे बरकी इदला मुका जनावारांचे रक्त कुर्बान करत नाहीत. ते यादिवशी स्वत रक्तदान करतात. येवढचं नवी या पवीत्र दिवशी ते रक्तदाना सोबतचं अवयदानाचाही संकल्प करतात. यंदाही त्यांनी मुस्लीम बांधवांना रक्तदान व अवयवदानाचे संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. मुस्लीम समाजाचे सामाजीक कार्यकर्ते पैगंबर शेख हे इदला लाख रुपयांचा बकरा विकत घेऊन त्याची कुर्बानी देत नाही. ते या येवजी गरिब मुस्लीनांना शाळेचे साहित्य वाटप करतात..त्यांचा शालेय खर्च उचलतात.

विचार करा खरी कुर्बानी कोणती आहे.. जे बोकड कापून दिली जाते की जी..सामाजीक कार्यातून दिली जाते. प्रत्येक धर्मात रुढी परंपरा, अमानवीय कर्मकांड असतात..ते आहेत..बरेच कर्मकांडाचा आपण नकार दिला आहे. काळानुसार त्यांच्यात बदल केले आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक धर्माने या बदलाचा स्विकार केला आहे. आज देशात असा क्वचीतचं एखादा सण उरला असेल ज्या सणाला वाद होतांना आपल्याला दिसत नाही. सण उत्सव तर सोडा महापुरशांच्या जयंत्या, पुतळे यावरूणही आता तणाव निर्माण होतो. संपुर्ण जग एआय कडून काय काय काम करुण घेता येइल यावर काम करतोय..आणि दुसरीकडे आपण त्याचं इतिहासाच्या चुकांची पुनर्वाृत्ती करतोय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra