राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
काल ३१ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पार पडली. या शिबिरासाठी सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महानगर प्रदेशातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून काम करतील. त्यांनी दौरे करून काही सहकाऱ्यांना सोबत घेत, मर्यादित कालावधीत पक्षाच्या मजबुतीसाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही सुनील तटकरे यांनी दिल्या.
डीएलओ आणि एसआयआर संदर्भात पक्षाने ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत अनिल भाईदास पाटील यांची सहसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संकलित करून पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. तसेच अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
२७ सप्टेंबर रोजी पक्षाचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर होणार असून, त्याचा अजेंडा आणि विचारमंथन लवकरच करण्यात येईल, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. या राज्यव्यापी शिबिराचा अजेंडा आम्ही एकत्रितपणे तयार करत आहोत. त्यातून राज्यातील तरुणाईपर्यंत एक व्यापक कार्यक्रम घेऊन जाणार आहोत. स्वर्गीय अजित पवार हे संपूर्ण तरुणाईचे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना त्यांचा विचारही या अजेंड्यावर नक्कीच असेल, असे सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Devendra Fadnavis : 'छात्रों की गूंज' नाही 'झूंठ की गूंज' आहे, फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
मोदींचा फोटो हटवला अन् वाद पेटला! अमित ठाकरेंविरोधात FIRची मागणीराष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

