Dailyhunt
Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings : RCB ने चेन्नईला चारली धूळ; CSK ची पराभवामध्ये हॅट्रिक, संघाला धोनीची कमी खळत आहे

Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings : RCB ने चेन्नईला चारली धूळ; CSK ची पराभवामध्ये हॅट्रिक, संघाला धोनीची कमी खळत आहे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला धुळ चारत आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला असून आरसीबीने सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला धुळ चारत आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला असून आरसीबीने सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला आहे. बंगळुरूने अवघ्या २० ओव्हरमध्ये २५० धावांचा डोंगराएवढा लक्ष चेन्नईसमोर ठेवला. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई मात्र २० ओव्हरमध्ये २०७ धवापर्यंतच पोहचु शकला असून चेन्नईने सलग तिसरा पराभव स्वीकारला आहे.

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ७.३० वाजता सामना रंगला रंगला. कर्णधार ऋतुराज गायकवाड नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय अतिशय चुकीचा ठरला. कारण, बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी सामन्याची जोरदार सुरुवात केली. यामध्ये विराटने १८ चेंडूत २८ धावा तर फिल सॉल्टने ३० चेंडूत ४६ धावांची शानदार पारी खेळली. मात्र, टीम डेविडने आपल्या धमाकेदार पारी खेळून क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. टीम डेविडने स्टेडियम बाहेर षटकार मारत अवघ्या २५ चेंडूत ७० धावांची ताबडतोड पारी खेळली. देविदात्त पडिक्कलने देखील २९ चेंडूत ५० धावा केल्या. तर कर्णधार रजत पाटीदारने १९ चेंडूत ४३ धावा केल्या.

दुसरीकडे, चेन्नई या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त १९ ओव्हरमध्ये संपूर्ण संघ बाद झाला. यामध्ये सरफराज खानने ४ चौकार आणि २ षटकार मारत संघासाठी सार्वधिक धावा केल्या . त्याने २५ चेंडूत अर्धशतक ठोकला असून प्रशांत वीर याने ४३ धावा केल्या. शिवाय, आयुष्य म्हात्रे, शिवम दुबे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांसारखे खेळाडू अपयशी ठरले. यामुळे चेन्नई फक्त २०७ धावापर्यंतच पोहचू शकला. मात्र या विजयामुळे आरसीबी संघाने टेबल पॉइंटवर मोठी झेप घेत पहिल्या स्थानी पोहचला आहे. शिवाय, चेन्नईच्या या सलग तिसऱ्या पराभवामुळे संघाला कुठे ना कुठे महेंद्र सिंग धोनीची कमी खळत आहे. यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना धोनी मैदानात कधी परतणार आणि आगामी सामन्यांमध्ये चेन्नई कसे प्रदर्शन करणार यांकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

Praful Patel On Sunetra Pawar Baramati : बारामती निवडणूक बिनविरोध करा; प्रफुल पटेल यांचे आवाहन, सर्वांशी बोललो पण…

Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; लक्ष्मण हाके यांची माघार, सुनेत्रा पवार यांना दिलासा

Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला धुळ चारत आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला असून आरसीबीने सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला आहे. बंगळुरूने अवघ्या २० ओव्हरमध्ये २५० धावांचा डोंगराएवढा लक्ष चेन्नईसमोर ठेवला. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई मात्र २० ओव्हरमध्ये २०७ धवापर्यंतच पोहचु शकला असून चेन्नईने सलग तिसरा पराभव स्वीकारला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra