Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sachin Ahir lettet to Uddhav Thackeray: उपसभापतीपदाचा अर्ज भरताच सचिन अहिर यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Sachin Ahir lettet to Uddhav Thackeray: उपसभापतीपदाचा अर्ज भरताच सचिन अहिर यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटातून उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन आठवड्यांत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात धक्कातंत्राचा वापर केला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) उपसभापदीपदाची निवडणूक १ जुलैला होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गटाचे विश्वासू आणि वरळीतील खंदे आमदार सचिन अहिर यांना आपल्या गटात खेचून आणलं आहे. अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यानंतर आता सचिन अहिर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आपल्या कामगार सेनेतील पदांचा राजीनामा दिला आहे.

माननीय श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,

महोदय शिवसेना पक्ष प्रमुख सस्नेह जय महाराष्ट्र…

आदरणीय महोदय, सविनय विनंती करतो की, मी सचिन अहिर, सरचिटणीस भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे. तथापि, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी महोदय आपण माझा हा राजीनामा मंजूर करण्यात यावा, तसचे आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे, ही नम्र विनंती. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील. धन्यवाद.

सचिन अहिर हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. वरळी मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे राखून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, विधानपरिषदेत एकदा तर विधानसभेत १९९९, २००४, २००९ साली असे तीनदा निवडून आले. २००९ साली त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्रीपद भूषवलं होतं. २०१९ साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २०२० मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली. २०२२ मध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली. ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख होती.

Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज

हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटातून उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन आठवड्यांत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात धक्कातंत्राचा वापर केला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) उपसभापदीपदाची निवडणूक १ जुलैला होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गटाचे विश्वासू आणि वरळीतील खंदे आमदार सचिन अहिर यांना आपल्या गटात खेचून आणलं आहे. अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यानंतर आता सचिन अहिर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आपल्या कामगार सेनेतील पदांचा राजीनामा दिला आहे.

सचिन अहिर यांनी पत्रात काय लिहिलं?

माननीय श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,

महोदय शिवसेना पक्ष प्रमुख सस्नेह जय महाराष्ट्र…

कोण आहेत सचिन अहिर?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra