Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज

Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज

हाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) उपसभापदीपदाची निवडणूक १ जुलैला होणार असल्याचे जाहीर केले.

त्यानंतर आज या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपलं 'धक्कातंत्र' वापरत थेट ठाकरे गटाचे विश्वासू आणि वरळीतील खंदे आमदार सचिन अहिर यांना आपल्या गटात खेचून आणलं आहे. अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

हा अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. खासदार संजय दिना पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यात सचिन अहिर यांचा मोठा वाटा होता, तसेच कामगार संघटनांमध्येही त्यांची मोठी पकड आहे. त्यामुळे त्यांचा हा निर्णय ठाकरे गटासाठी विशेषतः मुंबई आणि वरळीमध्ये अत्यंत घातक ठरणार आहे. आधी सहा खासदारांना गळाला लावल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर'ची दुसरी इनिंग सुरू केली असून, उपसभापतीपदाच्या शर्यतीत नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे सारख्या दिग्गजांची नावे मागे टाकत थेट सचिन अहिर यांना उमेदवारी देऊन शिंदेंनी रातोरात संपूर्ण निवडणुकीची गणिते बदलून टाकली आहेत.

सचिन अहिर हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. वरळी मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे राखून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, विधानपरिषदेत एकदा तर विधानसभेत १९९९, २००४, २००९ साली असे तीनदा निवडून आले. २००९ साली त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्रीपद भूषवलं होतं. २०१९ साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २०२० मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली. २०२२ मध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली. ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख होती.

Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे मुंबईची लाइफलाईन विस्कळीत; पहिल्याच पावसात मुंबईकरांची उडाली तारांबळ

हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) उपसभापदीपदाची निवडणूक १ जुलैला होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपलं 'धक्कातंत्र' वापरत थेट ठाकरे गटाचे विश्वासू आणि वरळीतील खंदे आमदार सचिन अहिर यांना आपल्या गटात खेचून आणलं आहे. अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच सचिन अहिर यांनी थेट शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

कोण आहेत सचिन अहिर?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra