Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिंदेसाठी बच्चु कडु मैदानात, २0२९ चा प्लॅन अक्टीव्हेट

शिंदेसाठी बच्चु कडु मैदानात, २0२९ चा प्लॅन अक्टीव्हेट

कनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असं विधान आमदार बच्चु कडु यांनी केलं आणि राजकीय चर्चांना उधाण आले. "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं, ते केंद्रात जावे; तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची भावना आहे," असे बच्चु कडु म्हणाले.

एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असं विधान आमदार बच्चु कडु यांनी केलं आणि राजकीय चर्चांना उधाण आले. "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं, ते केंद्रात जावे; तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची भावना आहे," असे बच्चु कडु म्हणाले.

राजकारणात कुठलही विधान हे हवेत दिलं जातं नाही, त्यामुळे बच्चु कडु यांनी दिलेलं हे विधान फक्त त्यांची वैयक्तिक इच्छा नाही तर तो २०२९ मध्ये होणार्या निवडणुकीच्या रोडमॅपचा भाग आहे.

राजकारणात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते; इथे कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चु कडु यांना नुकताच विधानपरिषदेची उमेदवारी दिली. बच्चु कडु यांनी त्यांना उमेदवारी जाहीर व्हायच्या १ दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला तसेच त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केला. यावेळीदेखील अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी बच्चु कडु यांना उमेदवारी देण्यामागची कारणे काय यावर चर्चा झाली. काहींनी हा निर्णय चुकला तर काहींनी याला मास्टरस्ट्रोक म्हटलं. पण हळूहळू आता समजायला लागलं आहे की हा मास्टरस्ट्रोकच आहे. एकनाथ शिंदे यांना राजकारणातील सगळे छक्के-पंजे माहीत आहेत. एकनाथ शिंदे हे आता थेट २०२९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपला प्रत्येक डाव टाकत आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी विविध चर्चा सुरु होत्या. उद्धव ठाकरे गटातून स्तः उद्धव ठाकरे परिषदेवर जातील की दुसर्या कोणाला संधी मिळेल, असं वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना संधी दिली. अंबादास दानवे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात फडणवीसांचा देखील रोल होता, कारण विधी मंडळात शिवसेना व एकुणचं एकनाथ शिंदे यांना भिडणारा नेता विरोधी बाकावर असावा, असं फडणवीसांच्या डोक्यात होतं. यातुनच अंबादास दानवे हे शिंदेवर वचक ठेवतील, असा विचार करून त्यांचा विधानपरिषदेचा मार्ग फडणवीसांनी मोकळा केळा. यालाच प्रतीउत्तर किंवा काउंटर म्हणून एकनाथ शिंदे यांनी बच्चु कडु यांना विधानपरिषदेच्या मैदानात आपल्या बाजूने उतरवलं. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी बच्चु कडु यांना संधी देण्यात आली. बच्चु कडु यांनी वारंवार सरकार विरोधात भूमिका घेत सरकारला धारेवर धरलं आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चु कडु यांनी शेतकऱ्यांचा लढा उभा केला होता,मोठं आंदोलन छेडलं होतं, ज्याला राज्यातील शेतकऱ्यांकडून भक्कम प्रतिसाद मिळाला. यानंतर कर्जमाफीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं. आता पुन्हा एकदा बच्चु कडु हे सरकार विरोधात आक्रमक दिसत आहेत. नुकताच महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला, मात्र या निर्णयातील काही अटी व शर्तींमुळे बच्चु कडु आक्रमक दिसले. महायुतीच्या अटी व शर्तीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होऊन वंचित राहू शकतात, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

विशेष म्हणजे विरोधक ज्या आक्रमकतेने सरकार विरोधात भूमिका घेत आहेत, त्याच आक्रमकतेने बच्चु कडु आपली भूमिका मांडत आहेत. यामुळे फडणवीसांवर वचक ठेवण्याचा एकनाथ शिंदेचा प्लॅन चांगलाच यशस्वी होताना दिसतो आहे. येवढंच नाही, तर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी भावना देखील त्यांनी मीडिया समोर व्यक्त करून दाखवली आहे. "५ ते २० दिवसांत आम्ही विदर्भात अनेक ठिकाणी पक्षासाठी दौरे केले, लोकांशी बोललो. चार दिवसांत मी विदर्भामध्ये २० सभा केल्या आहेत. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल, तसेच शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत, सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू… स्वबळावर करायचं की नाही, ते ठरले नाही. मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आहे," असं बच्चु कडु म्हणाले.

Devendra Fadnavis : विधानपरिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले आम्ही जागावाटपावर…

आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra