Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shravan 2026: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? जाणून घ्या सविस्तर

Shravan 2026: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? जाणून घ्या सविस्तर

श्रावण महिन्याला आता सुरुवात झाली आहे. श्रावण सुरु झाला की अनेक नियम काटेकोरपणे पाळावे लागतात अशातच एक महत्वाचा नियम म्हणजे श्रावणात मांसाहार करणं वर्ज असत. त्याचबोबर कोणत्याही प्रकारचे मद्यपान करणे म्हणजे श्रावणात ते मोठं पापचं मानलं जात.

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात शिव शंकराची आराधन आणि पूजा केली जाते. पण श्रावण महिन्यात मांसाहार करणं का वर्ज असत असा सर्वांनाच प्रश्न पडतो? या मागचं नेमकं कारण काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

श्रावण महिन्याला आता सुरुवात झाली आहे. श्रावण सुरु झाला की अनेक नियम काटेकोरपणे पाळावे लागतात अशातच एक महत्वाचा नियम म्हणजे श्रावणात मांसाहार करणं वर्ज असत. त्याचबोबर कोणत्याही प्रकारचे मद्यपान करणे म्हणजे श्रावणात ते मोठं पापचं मानलं जात. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात शिव शंकराची आराधन आणि पूजा केली जाते. पण श्रावण महिन्यात मांसाहार करणं का वर्ज असत असा सर्वांनाच प्रश्न पडतो? या मागचं नेमकं कारण काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पावसाळा मध्यवर्ती आला की श्रावण महिना येतो, पावसाळ्यात वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता असते अशा हवामानात संसर्गाचा धोका देखील तितकाच असतो. परिणामी, मांसामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू मोठ्या प्रमाणात असतात आणि ते पावसाळ्यात जास्त वाढण्याची शक्यता असते. मांस लवकर कुजते आणि दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. त्याचबरोबर पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. अनेक राज्यांमध्ये सरकार या काळात मासे न पकडण्याच्या सूचना जारी करतात. तज्ञ देखील या हंगामात मासे न खाण्याचा सल्ला देतात. याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे, पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण वाढते. पाण्यात बॅक्टेरियाची संख्या वाढते. परिणामी, माशांद्वारे मानवांमध्ये संसर्ग पसरण्याचा आणि उलट्या, जुलाब होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर हा माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार करणे टाळावे.

धार्मिक दृष्ट्या, श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यात पवित्रता आणि स्वच्छतेला महत्व दिले जाते. मांसाहार करणे हे या पवित्रतेच्या विरुद्ध मानले जाते. वैज्ञानिक दृष्ट्या, पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील ओलावा आणि दमटपणामुळे मांसाहार लवकर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. श्रावण महिन्यात मांसाहार न करणे हे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. यामुळे आरोग्याचे रक्षण होते आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते.

मांसाहार करताय? मग घर मिळणार नाही… प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात

Shravan Puja 2026: श्रावण महिन्यातले व्रत कसे पाळावे? जाणून घ्या सविस्तर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra