Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shravan Puja 2026: श्रावण महिन्यातले व्रत कसे पाळावे? जाणून घ्या सविस्तर

Shravan Puja 2026: श्रावण महिन्यातले व्रत कसे पाळावे? जाणून घ्या सविस्तर

श्रावण महिना आता काही दिवसांवर आला आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हणले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू परंपरा आहे.

या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात मात्र १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून, ११ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी याकाळात भक्त पूजा विधी आणि व्रत करतात. श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते.

श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.

श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी. एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावला. पूजा करत असताना "ॐ महाशिवाय सोमाय नम:" किंवा "ॐ नम: शिवाय" या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणा 'नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे' तसेच, शिवामूठ वाहताना "शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा", असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. आणि शंकराची आरती करा.

Haiwaan : 'हैवान' चित्रपटाचा टीझर रिलीज! रहस्य, थरार अन् धोका…; अक्षय-सैफच्या भूमिकेने वाढवलं गूढ

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत! नव्या फोटोशूटने चाहत्यांचं वेधलं लक्ष

श्रावण महिना आता काही दिवसांवर आला आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हणले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात मात्र १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून, ११ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी याकाळात भक्त पूजा विधी आणि व्रत करतात. श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते.

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा :
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.

श्रावण महिन्यात पूजा कशी कारवी?
श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी. एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावला. पूजा करत असताना "ॐ महाशिवाय सोमाय नम:" किंवा "ॐ नम: शिवाय" या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणा 'नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे' तसेच, शिवामूठ वाहताना "शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा", असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. आणि शंकराची आरती करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra