पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा संशय रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने व्यक्त केला आहे.
या आरोपांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या जेल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा संशय रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने व्यक्त केला आहे. या आरोपांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या जेल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
केतन अग्रवाल यांचा 18 जून रोजी लोहगडावर दरीत पडून मृत्यू झाल्याचा सुरुवातीला दावा करण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर तपासाला वेग आला. सिया गोयलच्या जबाबातील विसंगती आणि तिचे चेतन चौधरीसोबतचे संबंध तपासात महत्त्वाचे ठरले. दोघांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 2004 फोन कॉल झाल्याचे आणि 300 हून अधिक तास संवाद झाल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, लोहगडच्या CCTVमध्ये हुडी, मास्क आणि हेडफोन घातलेला तरुण दिसला.
त्यानंतर चेतनच्या फोन लोकेशनबाबतही पोलिसांनी तपास केला. पुढे स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील संशयित घटनाक्रम उलगडत गेला.केतनच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने व्यक्त केला आहे.
Shravan 2026: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? जाणून घ्या सविस्तर
Shravan Puja 2026: श्रावण महिन्यातले व्रत कसे पाळावे? जाणून घ्या सविस्तर

