Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश! मुंबईत आज ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा

विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश! मुंबईत आज ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा

नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाला अखेर मोठं यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे केंद्र सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.

गेल्या अनेक वर्षांत विविध मुद्द्यांवर आंदोलने झाली, मात्र विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारला निर्णय बदलावा लागल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा क्षण देशातील तरुण शक्तीच्या निर्धाराचं प्रतीक मानला जात आहे.

नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाला अखेर मोठं यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे केंद्र सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. गेल्या अनेक वर्षांत विविध मुद्द्यांवर आंदोलने झाली, मात्र विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारला निर्णय बदलावा लागल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा क्षण देशातील तरुण शक्तीच्या निर्धाराचं प्रतीक मानला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या घडामोडींचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी मुंबईत आज विशेष 'तिरंगा मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडणार आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तिरंगा हातात घेऊन नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मोर्च्याबाबत माहिती देताना राज ठाकरे यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले आहे. हा कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेला जनआंदोलनाचा उत्सव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक सहभागीने हातात राष्ट्रध्वज घेऊन उपस्थित राहावे आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करावा, असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सत्तेच्या जोरावर प्रत्येक प्रश्न दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही अखेर जनतेच्या आवाजासमोर झुकावे लागते. विद्यार्थ्यांच्या एकजुटीने हा बदल घडवून आणला असून हा विजय संपूर्ण देशातील तरुणांचा आहे. शिवाजी पार्क येथे विशेष व्यासपीठ उभारण्यात येणार असून तेथे सर्व उपस्थितांच्या सहभागातून विद्यार्थ्यांच्या लढ्याचा गौरव करण्यात येणार आहे.

दरम्यान, मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर रेल्वे स्थानकापासून शिवाजी पार्कपर्यंत मोफत बाईक सेवेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या तिरंगा मोर्चाला काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या मोर्चात विविध विरोधी पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे.

CJP चं दिल्लीत आंदोलन! जे. पी नड्डांसोबत बैठकीत चर्चा, नड्डांकडे दिलं मागण्यांचं पत्र

गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात तासभर चर्चा; प्रधान राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra