Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Amit Shah's Pune visit : " भारताच्या चाणक्याचे शौर्यभूमीत स्वागत"! विरोधक आक्रमक;  काही बॅनर पोलिसांनी हटवले, शहरात कडेकोट बंदोबस्त

Amit Shah's Pune visit : " भारताच्या चाणक्याचे शौर्यभूमीत स्वागत"! विरोधक आक्रमक; काही बॅनर पोलिसांनी हटवले, शहरात कडेकोट बंदोबस्त

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्टचा राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुण्यात काय घडतंय ?

1. सुरक्षा कडेकोट: शहा मुक्कामी असलेल्या हॉटेल रिट्झ कार्लटन हेरिटेजच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यांच्या ताफ्यातील वाहनांची डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसह ते हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

2. बॅनरबाजी: शहरात दोन्ही बाजूंनी बॅनर लागले आहेत. भाजपकडून "भारताच्या चाणक्याचे शौर्यभूमीत स्वागत" असे बॅनर, तर काँग्रेसकडून "तुमचे ते लेकरू आणि आमचं ते कार्ट" सारखे उपरोधिक बॅनर झळकले. काही बॅनर पोलिसांनी हटवले आहेत.

3. विरोध आणि धरपकड: CJP आंदोलन, NEET पेपरफुटी आणि जंतर-मंतर लाठीचार्जच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शहांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. काल रात्रीपासून 100 ते 150 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी केला आहे. अनेकांना नोटीसा देऊन डेक्कन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले आहे.

4. भाजपचा इशारा: भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटले की, काँग्रेस जिथे आंदोलन करेल तिथे सकाळी 9 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ भाजप कार्यकर्तेही जमतील. पोलिसांनी आडकाठी आणल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

पुरस्कार सोहळ्यात शहा NEET पेपरफुटी आणि आंदोलकांवरील लाठीहल्ल्यावर भाष्य करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Top News Marathi