Sunday, 19 Jan, 9.23 pm TV9 मराठी

होम
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्तीच्या निधीत 9 कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराचा दावा

उस्मानाबाद : नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विकास वस्तीच्या निधीत 9 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली (scam in Development scheme) आहे. नगर परिषदांना अंधारात ठेऊन जिल्हा नियोजन समितीने स्माशनभूमीतील सौर दिवे व पालिकेतील कॉम्पॅक्टरच्या कामात हा अपहार केला आहे. तसेच नगर परिषदांच्या परस्पर हा निधी खर्च करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केली आहे.

नगर परिषद क्षेत्रात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विकास वस्तीत काम करण्यासाठी 2018-19 या वर्षात सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र तो खर्च न करता तसाच ठेवला. त्यानंतर वेगळ्या बँकेत खाते काढून नगर परिषदांचे प्रस्ताव न घेता खर्च करण्यात आला. या जिल्ह्यातील तब्बल 72 स्मशानभूमीत ही रक्कम खर्च केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र प्रत्यक्षात स्मशानभूमीची संख्याच कमी आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या या कामाची कागदपत्रे सुद्धा अधिकारी दाखवत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विकास वस्तीच्या या कामाच्या टेंडर प्रकियेचे आणि खर्चाच्या चौकशीचे आदेश पालकमंत्री शंकर गडाख यांनी दिले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे असेही मागणी आता जोर धरु लागली (scam in Development scheme) आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top