Monday, 13 Jul, 4.48 pm TV9 मराठी

होम
भारतात Google तब्बल 75 हजार कोटीची गुंतवणूक करणार, सीईओ सुंदर पिचाईंची मोदींसोबत बैठक

मुंबई : गुगलने भारतात 10 बिलियन डॉलर (Google Announce To Invest 10 Billion Dollar In India) म्हणजेच जवळपास 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूमुळे देशावर आर्थिक संकट आलं आहे, अशा परिस्थितीत गुगलने भारतात इतक्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

या गुंतवणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिजीटल भारताचं स्वप्न साकारण्यात मदत होईल, असं गुगलने सांगितलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुंदर पिचाई आणि मोदींची व्हर्च्युअल बैठक

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात चर्चा झाली. यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची माहिती दिली. 'आम्ही शेती, तरुण आणि व्यापाऱ्यांचं जीवन बदलण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल चर्चा केली', असं पंतप्रधानांनी सांगितलं (Google Announce To Invest 10 Billion Dollar In India).

Google For India च्या वार्षिक कार्यक्रम आज व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला. कोरोनाविषाणूमुळे हा कार्यक्रम वर्चुअली घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात Google आणि Alphabet चे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित होते.

Google Announce To Invest 10 Billion Dollar In India

:

Google | पत्नीचा फोन ट्रॅक करणे, पतीची हेरगिरी करणे, जाहिरातींवर गुगलकडून बंदी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top