Sunday, 19 Jan, 6.57 pm TV9 मराठी

होम
भारतात व्हॉट्सअॅप डाऊन, फोटो, व्हिडीओ शेअर करताना युजर्सला अडचणी

नवी दिल्ली : आजच्या युगात सोशल मीडिया अनेक लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झालेले व्हॉट्सअॅप भारतात डाऊन झाले (Whatsapp down) आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास व्हॉट्सअॅप अचानक डाऊन झाल्याची माहिती मिळत आहे. याचा फटका भारतातील लाखो युजर्सना बसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअॅप अचानक डाऊन झाले आहे. रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास काही युजर्सला व्हॉट्सअॅपवरुन फोटो, व्हिडीओ, स्टीकर्स, अन्य फाइल्स डाऊनलोड करण्यास अडचणी येत आहे. तर काहींना टेक्स्ट मॅसेजही पाठवताना अडचणी येत आहे. भारतातील लाखो युजर्स व्हॉट्सअॅप डाऊन असल्याची तक्रार सोशल मीडियावर करत (Whatsapp down) आहे.

या तक्रारीनंतर व्हॉट्सअॅपची टेक्निकल टीम यावर काम करत आहे. युजर्सला निर्माण झालेली ही समस्या लवकरात लवकर मिटावी. तसेच युजर्सला मिडीया फाईल्स, फोटो पुन्हा शेअर करता यावे यासाठी आमचे तज्ञ काम करत आहे. यासाठी काही ठराविक वेळ लागू शकतो. तोपर्यंत महत्त्वाच्या फाईल्स अपलोड करण्यासाठी युजर्सने Telegram, WeChat, Facebook चा वापर करावा, असे व्हॉट्सअॅपकडून सांगितले जात आहे.

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर याबाबत ट्रेंड सुरू केला आहे. #whatsappdown यावर अनेक युजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहे. तसेच यावर मीम्सचाही पाऊस पडत आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप हे भारतासह, ब्राझील, मध्य आशिया, युरोप, अमेरिका आणि संयुक्त अरबमध्येही डाऊन झाल्याची माहिती मिळत आहे. Downdetector या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top