Monday, 13 Jul, 4.04 pm TV9 मराठी

होम
CBSE 12th Results 2020 | सीबीएसई बोर्डाच्या बारावीचे निकाल जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाइट ccbseresults.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. cbse.nic.in या सीबीएसईच्या मुख्य संकेतस्थळावरही निकाल पाहू शकता. (CBSE 12th Results 2020 announced)

या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. 'तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मी पुन्हा सांगतो, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमचे प्राधान्य आहे.' असे निशंक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

कोव्हिडमुळे गुणवत्ता यादी किंवा मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे निकाल एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनामुळे सीबीएसईचे निकाल लागण्यास उशीर झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यावर्षी एकूण 12 लाख 3 हजार 595 विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 11 लाख 92 हजार 961 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. 10 लाख 59 हजार 80 विद्यार्थी सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झाले. एकूण 88.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसई निकाल 2020 कसा पाहावा?

1. अधिकृत वेबसाइट- cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in वर लॉग इन करा
2. परीक्षार्थींनी आपला परीक्षा क्रमांक आणि जन्मतारीख यासारख तपशील भरावा.
3. बारावीच्या आपल्या सीबीएसई बोर्डाचे निकाल तपासावे

(CBSE 12th Results 2020 announced)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top