Monday, 13 Jul, 5.21 pm TV9 मराठी

होम
चंद्रपुरात मनपाची आयडिया, शिक्षकच विद्यार्थ्यांच्या घरी, आपआपल्या भागातील विद्यार्थ्यांना धडे

चंद्रपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद (Chandrapur School teacher) आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. पण ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षण परवडणारे नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक स्वत: विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवत आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांनी हा लक्षवेधी उपक्रम सुरु केला आहे. सध्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत (Chandrapur School teacher) आहे.

शिक्षक एकाच प्रभागातील जवळ-जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवत आहेत. गरीब घटकातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सुरू केलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात समाविष्ट करून घेत शिक्षणाची गोडी कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

चंद्रपूर मनपा शाळेच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक त्यांच्या घरी जाऊन शिकवत आहेत. यासाठी सोपे आणि सुटसुटीत वेळापत्रक आखण्यात आले आहे. शहरात मनपाच्या 29 शाळा आहेत. यात 2400 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. तर 74 शिक्षक यासाठी नेमणुकीला आहेत. मनपाच्या शिक्षण विभागाने शाळा आणि त्यातील शिक्षक यांची विभागणी करत प्रभागात जवळ-जवळ राहणार्‍या विद्यार्थ्यांना एकत्र करून एका निश्चित घरी त्यांचा अभ्यास आणि गृहपाठ करून घेतला जात आहे. अशा रीतीने आपल्या पुढच्या वर्गातील शिक्षणाचे काय? हा विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न सुटला आहे. हे सर्व करत असताना कोरोनाच्या नियमांचे पालन देखील कटाक्षाने केले जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मार्च महिन्याच्या मध्यापासून जूनच्या आतापर्यंतचा चार महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांना सुट्टीसाठी मिळाला. मात्र घराबाहेर पडायचे नसल्याने घरात कोंडलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेची आस वाटू लागली होती. नवी पुस्तके, नवा वर्ग आणि शिक्षणाची नवी गोडी यामुळे विद्यार्थ्यांनी ही नव्या प्रयत्नांना आनंदाने पाठिंबा दिला आहे. नव्याकोऱ्या पुस्तकांसह आपल्या आवडीच्या शिक्षकांना घरीच शिक्षण देताना पाहून त्यांचा उत्साह दुणावला आहे.

:

E-School Reopens | ना शाळेची घंटा, ना सवंगड्यांची भेट, वर्च्युअल शाळा उघडल्या, ई-शिक्षणाचा श्रीगणेशा

Unlock Special Report | शाळांबाबात सरकारचा नेमका प्लॅन काय?

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top