Sunday, 19 Jan, 10.08 pm TV9 मराठी

होम
गेल्या 6 वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व : निर्मला सीतारमण

चेन्नई (तामिळनाडू) : 'गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे', अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण (central minister Nirmala Sitaraman) यांनी दिली. चेन्नई येथे सुरु असेलल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यात सीतारमण यांनी ही माहिती दिली. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सर्वत्र वाद सुरु आहे. अनेकांकडून या कायद्याला विरोध (central minister Nirmala Sitaraman) केला जात आहे. तसेच सीतारमण यांनी केलेलं वक्तव्य हे सध्या महत्त्वाचं ठरत आहे.

'गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार 838, अफगाणीस्तामधून आलेल्या 914 आणि 172 बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे. 1964 पासून ते 2008 पर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक तामिळ (श्रीलंकेचे) लोकांना भारतीय नागरिकत्न दिलं आहे', असं सीतारमण यांनी सांगितले.

2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानमधून आलेल्या 566 पेक्षा अधिक मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे. 2016 ते 2018 दरम्यान मोदी सरकारच्या काळात जवळपास 1595 पाकिस्तानी प्रवाशांना आणि 391 अफगाणीस्तानच्या मुस्लिमांना भारताने नागरिकत्व दिलेलं आहे. 2016 मध्ये गायक अदनान सामीलाही भारतीय नागरिकत्व मिळालेले आहे', असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

'यापूर्वी पाकिस्तानमधून आलेल्या लोकांना देशात वेगवेगळ्या कॅम्पमध्ये बसवण्यात आले. ते आताही तिथेच राहतात. त्यांना तिथे राहून 50 ते 60 वर्ष झाली आहेत. जर तुम्ही या कॅम्पमध्ये जाल तर तुम्ही रडाल. श्रीलंकन लोकांच्या कॅम्पमध्येही ही अवस्था आहे. ते आज अनेक सुविधांपासून वंचित आहेत', असं सीतारमण यांनी सांगितले.

'सरकार कुणाचे नागरिकत्व काढून घेत नाही. हा कायदा प्रत्येकासाठी चांगला आहे. आम्ही फक्त काही लोकांना नागरिकत्व देणार आहे', असं सीतारमण यांनी सांगितले.

'नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) दर दहावर्षांनी अपडेट केले जाईल. याचा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस (NRC) सोबत काही संबंध नसेल. काही लोक अफवा पसरवत आहेत', असंही सीतारमण म्हणाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top