Saturday, 14 Dec, 6.28 pm TV9 मराठी

होम
घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक, म्होरक्या निघाला सिव्हिल इंजिनिअर

यवतमाळ : जिल्ह्यात एका घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक (Civil Engineer boy robbers) केली आहे. या टोळीने यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याने पुसदच्या इंजिनिअरिगं महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आहे. अमजद खान (28) असं या म्हरोक्याचे (Civil Engineer boy robbers) नाव आहे.

गेल्या महिन्याभरात यवतमाळ जिल्हातील यवतमाळ शहरासह पुसद भागात मोठ्या घरफोडीच्या घटना घडल्या. या घटनांमुळे पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. या टोळीला शोधणे पोलिसांसाठी आव्हान झाले होते. शेवटी तांत्रिक पद्धतीने आणि गुप्त माहितीच्या आधारे या टोळीचा छडा पोलिसांनी लावला आणि या टोळीला जेरबंद करण्यात आले.

ही टोळी घरी कोणी नसल्याचे पाहून घर फोडून लूटमार करायची. या टोळीकडून घातक असा शस्त्रसाठासुद्धा जप्त करण्यात आला आहे. त्यात 7 गावठी बनावटीचे पिस्तल, 118 जिवंत काडतुसे, 17 धारधार चाकू, 7 तलवारी, विविध कंपनीच्या चोरलेल्या 22 दुचाकी गाड्या असा एकूण 14 लाख 34 हजारचा मुद्देमाल टोळीकडून हस्तगत केला आहे.

या टोळीचा मोरक्या अमजद खानसह देव ब्रम्हदेव राणा, मोहम्मद सोनू, मोहम्मद आसिफ, मोहम्मद अफजल, सागर रमेश हसनापुरे, मंगरुळ दस्तगीर, लखन देविदास राठोड अशा एकूण 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अशी टोळी पकडल्यावर या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top