Thursday, 23 Jan, 11.53 am TV9 मराठी

महाराष्ट्र
LIVE : मनसेच्या राजमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याविरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरणार

मनसेच्या राजमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याविरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरणार

मनसेच्या राजमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध, नव्या झेंड्याविरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरणार, निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार, वेळ पडल्यास संभाजी बिग्रेड न्यायालयात जाणार, नव्या झेंड्यावरील राजमुद्रा मागे घेतली नाही तर संभाजी बिग्रेड रस्त्यावर उतरणार

23/01/2020,11:52AM

मनसेच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर, आम्ही न्यायालयात जाणार : विनोद पाटील

मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर केल्यामुळे अत्यंत दुःख झालं आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जर न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असं मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी सांगितले.

23/01/2020,11:22AM

मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवमुद्रा, कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष

23/01/2020,10:23AM

राज ठाकरेंकडून मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण

23/01/2020,10:19AM

मनसेच्या महाअधिवेशनात मंचावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो

23/01/2020,9:31AM

कळंबोलीमध्ये घरात स्फोट, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

कळंबोलीमध्ये घरात स्फोट झाला आहे. कंळोबोलीतील डिंपी सोसायटीमधील घरात ही घटना घडली. रात्रच्या वेळेत आग लागली असून अद्याप कारण अस्पष्ट आहे. घरातील सगळे बाहेर गेले असताना ही घटना घडली. त्यामुळे घटनेत कुणीही जखमी नाही. पण मोठी वित्तहानी झाली.

23/01/2020,8:56AM

बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकाची कमाल, थेट परभणी ते मुंबई सायकल प्रवास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कवरील त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक थेट परभणीवरुन सायकल प्रवास करत मुंबईत आला आहे. विशेष म्हमजे 600 किलोमीटरचा पल्ला पार करत हा शिवसैनिक मुंबईत दाखल झाला आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठपिंपळगावचा हा शिवसैनिक आहे. रामचंद्र गायकवाड असे त्याचे नाव असून दिवसाला 90 किलोमीटर सायकलवर प्रवास करीत होता.

23/01/2020,8:49AM

राज ठाकरे सहकुटुंब 'कृष्णकुंज'हून रवाना

23/01/2020,8:42AM

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा आज (23 जानेवारी) वचनपूर्ती सोहळा आहे. संध्याकाळी 6 वाजता वांद्रे, कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीच्या मैदानात या सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासोबत 11 ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात येणार आहे.

23/01/2020,8:42AM
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top