Friday, 15 Nov, 10.14 am TV9 मराठी

महाराष्ट्र
LIVE : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ओला दुष्काळ पाहणी दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ओला दुष्काळ पाहणी दौरा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाच्या दौऱ्यावर, मातोश्री बंगल्यावरून उद्धव ठाकरे यांचा ताफा एअरपोर्टच्या दिशेनं रवाना, उद्धव ठाकरे सांगली, सातारा भागातील ओल्या दुष्काळाची पाहणी करणार, सरकार स्थापने संदर्भात घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार, शेतकऱ्यांशी संवादही साधणार

15/11/2019,10:02AM

मुरुडमध्ये दुकानदाराकडून तरुणाची निघृण हत्या

लातूर : मुरुडमध्ये तरुणाची निघृण हत्या, सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कृष्णा पांचाळ (वय-20) याच्या शरीराचे तुकडे करून हत्या, डोके, धड, हात-पाय, वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, आरोपी सचिन गायकवाडला अटक, आरोपी सचिन गायकवाडच्या ऑटोमोबाईल्स दुकानात मयत कृष्णा पांचाळ कामाला होता, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

15/11/2019,9:57AM

महासेनाआघाडीमध्ये खातेवाटप सर्वांच्या सहमतीनं होण्याची शक्यता

मुंबई : महासेनाआघाडीमध्ये खातेवाटप सर्वांच्या सहमतीनं होण्याची शक्यता, महत्त्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देणार, ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एक पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात, गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता, तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता, नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसरा पक्षाला दिलं जाण्याची शक्यता, ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात

15/11/2019,9:51AM

अवकाळी पावसामुळे राज्यात 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचं नुकसान

मुंबई : अतिपावसामुळे राज्यात 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचं नुकसान, कापूस, सोयाबीन, धान आणि फळबागांचं मोठं नुकसान, पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाणार, राज्यपालांकडून पाठपुरावा सुरु असल्याची माहिती, मुख्य सचिवाच्या मान्यतेनंतर केंद्रीय कृषी सचिवाकडे जाणार नुकसानीचा अंतिम अहवाल, शेतकऱ्यांच्या नजरा केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर

15/11/2019,9:49AM

ओल्या दुष्काळात शेचकऱ्यांचं 8 हजार कोटीचं नुकसान, प्रस्ताव राज्यपालांकडे सादर

मुंबई : ओल्या दुष्काळ संदर्भात एकूण नुकसानीचा प्रस्ताव तयार, राज्य प्रशासनाकडून प्रस्ताव तयार, सुमारे 8 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्रस्ताव तयार, राज्य प्रशासनाने 8 हजार कोटी नुकसान भरपाईचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर, राज्यपाल आज प्रस्तावावर निर्णय घेणार

15/11/2019,9:44AM

काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वाची बैठक

मुंबई : काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वाची बैठक, टिळक भवनमध्ये बैठक, जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

15/11/2019,9:41AM

समुद्रात एलईडी मासेमारीवरुन दोन गटात तुबंळ हाणामारी

रायगड : भर समुद्रात एलईडी मासेमारीवरुन दोन गटात तुबंळ हाणामारी, एलईडी मासेमारी करताना आढळलेली बोट रोखताना दोन गटात वाद, दगड धोडें, काठ्या-लाठ्याने मारहाण, रात्री उशिरा अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस आणि मत्सव्यवसाय विभागाला वाद मिटविण्यात यश

15/11/2019,9:39AM
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top