Thursday, 27 Feb, 11.46 am TV9 मराठी

होम
LIVE : विधानभवनात मराठी भाषा दिनाचा गौरव

भले मुलांना इंग्रजी शाळेत टाका, परंतु मुलांनी घरात मराठीच बोललं पाहिजे - अजित पवार

27/02/2020,11:44AM

विधानभवनात मराठी भाषा दिनाचा गौरव

27/02/2020,10:53AM

अश्लील उद्योग चित्रपटाच्या नावाला ब्राम्हण महासंघाचा विरोध

अश्लील उद्योग चित्रपटाच्या नावाला ब्राम्हण महासंघाने विरोध केला आहे. चित्रपटामुळे तरुणांमध्ये विकृती वाढीस लागणार असल्याचा आरोपही या ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येत आहे. अश्लील उद्योग चित्रपट म्हणजे सॉफ्ट पॉर्न असल्याची टीका महासंघाचे आनंद दवे यांनी केली.

27/02/2020,10:41AM

सायन उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद

सायन उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. याबाबतची माहिती माटुंगा वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

27/02/2020,9:23AM

वाशिम येथे पोलीस शिपायाची आत्महत्या

वाशिम येथे पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वाशिम तालुक्यातील चिखली रोडवर घडली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

27/02/2020,9:19AM

नागपूर महापालिकेत 100 टक्के कर्मचाऱ्यांची हजेरी

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या दराऱ्याने नागपूर महापालिकेत कर्मचार्यांची हजेरी 100 टक्क्यांवर आली आहे. महिनाभरात महानगरपालिका कर्मचाऱ्यांची हजेरी 60 वरुन 100 टक्क्यांवर आली आहे. लेटलतीफ कर्मचारीही आता वेळेपूर्वी कार्यालयात येतात.

27/02/2020,9:16AM

माजी नगरसेवकाच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार

मालेगाव येथील माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर अज्ञाताने गोळीबार केला. गोळीबारात रिजावन खान थोडक्यात बचावले आहेत. ही घटना मालेगाव येथील महेश नगर येथे घडली.

27/02/2020,9:11AM

निफाडचा पारा घसरला, थंडीत वाढ

नाशिकमधील निफाड येथील पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 7.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

27/02/2020,9:07AM

दिल्ली हिंसाचारात 28 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 250 जखमी

दिल्ली हिंसाचारमध्ये 28 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर 250 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिट्री फोर्स रात्रं-दिवस गस्त घालत आहे. सद्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

27/02/2020,9:04AM
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top