Sunday, 19 Jan, 5.50 pm TV9 मराठी

होम
मला इंग्रजी येत नाही, इंग्रजीत बोललो तर जोक होतो : रावसाहेब दानवे

नाशिक : 'मला इंग्रजी येत नाही. मी इंग्रजीत बोललो तर जोक होतो,' असे हास्यास्पद वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भाषणादरम्यान (raosaheb danve speech) केलं. नाशिकच्या गोकुळ फाऊंडेशनच्या एल. डी. पाटील अकॅडमीतील इंग्रजी मीडियम इमारतीच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

'मला इंग्रजी येत नाही. मी तोडकीमोडकी इंग्रजी बोलतो. माझे शिक्षण मराठीतून झाले आहे. आमच्याकडे इंग्रजी शाळा नव्हत्या. मी इंग्रजी बोललो तर जोक होतो,' असे रावसाहेब दानवे म्हणाले.

'नटवरसिंग खुर्चीवर बसतील म्हणून ब्रम्हदेव देवाने पाणी दिल नाही. अटलजींना पाणी दिले, दुसऱ्यांना चहा दिला. तिसऱ्याला सुपारी दिली, मग मला का नाही? असा प्रश्नही दानवेंनी उपस्थित (raosaheb danve speech) केला.

'आमदार सीमा हिरे आणि दिनकर अण्णा पाटील यांचे कायम भांडण व्हायचे. ते मिटवण्याचे काम मी केलं, असेही दानवे म्हणाले. पुढच्या पाच वर्षात अजून काही होईल सांगता येत नाही,' असेही दानवे यावेळी म्हणाले.

या भाषणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लवकरच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाची निवड होईल. तर उद्या (20 जानेवारी) भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार आहे असे दानवेंनी सांगितले.

मी 22 तारखेला जम्मू काश्मीरला जाणार आहे. तिथल्या लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. त्या लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आणि सरकारला कळवणार आहे. केंद्राचे विशेष लक्ष जम्मू कश्मीरकडे आहे. ज्या योजना पोहचल्या नाहीत, त्या पोहोचवण्याचं काम सरकार करत आहे, असेही दानवे (raosaheb danve speech) म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top