Sunday, 19 Jan, 8.12 pm TV9 मराठी

होम
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे

अहमदनगर : साईबाबांच्‍या जन्‍मस्‍थळाच्या वादानंतर शिर्डीकरांनी शिर्डी बंदची हाक देण्यात आली (Live updates of Shirdi Band) होती. यात सर्व स्तरावरील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला. नुकतंच हा बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे. शिर्डी कृती समितीचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी याबाबतची घोषणा (Live updates of Shirdi Band) केली.

आज रात्री 12 नंतर बंद मागे घेण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. यासाठी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेही प्रयत्न करत आहेत, असे कैलास कोते यांनी सांगितले. उद्या दुपारी 2 वाजता. ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी गावकरीही उपस्थिती राहतील, असेही कोते म्हणाले.

शिर्डीच्या धर्तीवर पाथरीचा साईबाबा जन्मस्थान म्हणून विकास करण्याला शिर्डीकरांचा विरोध आहे. त्यासाठीच हा बेमुदत बंद करण्यात आला होता. यामुळे पहाटेपासूनच साईभक्तांच्या अडचणीत वाढ झाली होती. देशभरातून आलेल्या साईभक्तांना ऐनवेळी बंद पाळण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर साई मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा आणि इतर वाहनांची कोणतीही व्यवस्था नव्हती (Shirdi Band). विशेष म्हणजे वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

दरम्यान शिर्डी बंदच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि पाथरी ग्रामस्थांची उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार आहे. या बैठकीतून लवकरच मार्ग काढला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

ग्रामसभेत शिर्डी बंदची घोषणा

शिर्डीत रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. शनिवारी (18 जानेवारी) शिर्डीत ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांनी शिर्डी बंदची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंदचं आवाहन शिर्डीवासीयांनी केलं आहे. भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याविषयावर आक्रमक पवित्रा घेतला. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं विधान तात्काळ मागे घ्यावं, अशी मागणी राधाकृष्ण विखेंनी केली.

शिर्डीतील व्यापारी वर्ग देखील सर्व व्यवहार बंद ठेवणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिर्डी बंदमुळे 24 तास खुली असणारी शिर्डी रात्री 12 वाजल्यानंतर बंद होण्यास सुरूवात झाली. यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. तसेच भाविकांचीही गैरसोय होणार आहे.

दरम्यान, पाथरीमध्ये देखील बंद पुकारण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी पाथरी बंद मागे घेण्यात आला. रात्री उशीरा पाथरी बंद मागे घेत पाथरी येथील साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याची घोषणा करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top