Monday, 13 Jul, 7.20 pm TV9 मराठी

होम
Rajasthan Political Crisis LIVE | गहलोत यांच्याकडे 84 आमदारांचंच बळ, पायलट गटाचा दावा

जयपूर : राजस्थानातील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस विधीमंडळ बैठकीला 107 आमदारांनी हजेरी लावल्यानंतर, गहलोत सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र आता नाराज सचिन पायलट गटाने गहलोत यांना केवळ 84 आमदारांचाच पाठिंबा आहे, असा दावा केल्याने, नाट्यमय वळण मिळालं आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार डळमळीत (Rajasthan Political Crisis) करण्याचे राजकारण सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीला तब्बल 107 आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे अशोक गहलोत सरकार स्थिर असल्याचं सिद्ध झालं. अशोक गहलोत यांनी या बैठकीनंतर आमच्याकडे 200 आमदार असल्याचं विनोदाने सांगितलं.

उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडाने तसंच त्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठीने, काँग्रेसच्या सत्तेवरील ढग काळवंडले आहेत. सचिन पायलट यांनी कालच सध्याचे भाजप नेते आणि त्यांचे काँग्रेसमधील जुने मित्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक झाली. त्याआधी रात्री अडीच वाजता काँग्रेसच्या दिल्लीवरुन आलेल्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत, सरकार स्थिर असल्याची माहिती दिली होती.

राजस्थानमधील 200 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे 107, भाजप 72 तर इतर आणि अपक्ष असे एकूण 21 आमदार आहेत. इथे स्थापनेसाठी 101 जागांची आवश्यकता आहे. तो आकडा काँग्रेसने सहज पार केला आहे. काँग्रेसला अपक्षांचीही साथ आहे.

दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधीमंडळाची बैठक झाली. यासाठी सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र सचिन पायलट या बैठकीला हजर राहिले नाहीत. पायलट गटाने आपल्यासोबत 30 आमदार असल्याचा दावा केला होता. राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या काँग्रेस नेते सचिन पायलट यांची नाराजी सत्तास्थापनेपासून पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असताना उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाल्याने पायलट काहीसे खट्टू होते.

दरम्यान, आजच्या बैठकीला काँग्रेस आणि अपक्ष मिळून 18 आमदार गैरहजर होते. मात्र सचिन पायलट समर्थक काही आमदार या बैठकीला हजर राहिले.

यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं म्हटलं होतं. महतत्वाचं म्हणजे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या स्वत: राजस्थानच्या सत्तासंघर्षात लक्ष देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rajasthan Political Crisis LIVE

 • आम्ही कोणत्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नाहीत. शिवाय आमची कोणाशीही चर्चा सुरु नाही. अशोक गहलोत यांच्याकडे काँग्रेसच्या केवळ 84 आमदारांचाच पाठिंब आहे, असा दावा सचिन पायलट समर्थकांनी केला आहे.
 • राजस्थान काँग्रेस विधीमंडळ बैठकीला 107 आमदारांची उपस्थिती, अशोक गहलोत यांचं सरकार स्थिर, सचिन पायलट यांच्यासह काँग्रेस आणि अपक्ष मिळून 18 आमदारांची गैरहजेरी
 • सचिन पायलट यांना राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्याची सूत्रांची माहिती. संघटनेच्या जबाबदारीवरुन मुक्त केले जावे अशी मागणी अशोक गहलोत यांनी विधिमंडळाच्या बैठकीत केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटविल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेसच्या अधिकृत घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष.
 • काँग्रेस विधीमंडळ बैठकीला 90 आमदार उपस्थित आहेत. यामध्ये सचिन पायलट समर्थक चार आमदारांचाही समावेश आहे. याशिवाय दहा अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित आहेत.
 • कॉंग्रेस विधीमंडळ बैठक सुरु. सचिन पायलट गटाचे चार आमदारही उपस्थित, दानिश अबरारही अशोक गहलोत यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
 • राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना 109 आमदारांनी संमती पत्र दिल्याचा दावा केला आहे.
 • 'व्हीप मोडल्यास आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. सचिन पायलट आले नाहीत, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, हे नियम सर्वांसाठी समान आहेत' असे अविनाश पांडे म्हणाले. शनिवार-रविवारच्या बैठकांना पायलट गैरहजर होते.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.

- तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी

भाजपने एका जागेसाठी आपले दोन उमेदवार राजेंद्र गहलोत आणि ओंकारसिंग लखावत यांना मैदानात उतरवले आहे. आता काँग्रेसला भीती आहे की भाजप आपला दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करेल. त्यामुळेच सर्व काँग्रेस आणि समर्थक आमदारांची रिसॉर्टमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

राजस्थानचे पक्षीय बलाबल

 • काँग्रेस - 107
 • काँग्रेस समर्थक अपक्ष - 12
 • काँग्रेस समर्थक इतर - 05
 • भाजप - 72
 • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष - 03
 • भाजप समर्थक अपक्ष - 1

Sachin Pilot | काँग्रेसचा 'पायलट' भाजप एअरलाईन्सच्या वाटेवर, नड्डांच्या उपस्थितीत सचिन पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं

Rajasthan Politics | सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला, राजस्थानमध्ये राजकीय भूंकपाची चिन्हे

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top