Tuesday, 15 Oct, 7.33 am TV9 मराठी

होम
सुपर ओव्हरच्या नियमांमध्ये बदल, नवा नियम काय?

नवी दिल्ली : आयसीसी वर्ल्ड कप 2019 च्या सुपर ओव्हरच्या वादानंतर अखेर आयसीसीने नियमामध्ये बदल केले (Super Over Rule Change) आहे. नवीन नियमानुसार, जर उपांत्य किंवा अंतिम सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जोपर्यंत दोन्ही संघांमधील एक संघ जास्त धावा करत विजेता होत नाहीत, तोपर्यंत ही सुपरओव्हर चालू राहिल. यापुढे होणारे कोणत्याही सामना निर्विवाद व्हावा, यासाठी आयसीसीच्या क्रिकेट समितीने हा निर्णय घेतला आहे.

या नव्या नियमानुसार जर एखादी सामना टाय झाला, तर तो सामना टाय म्हणूनच ग्राह्य धरला जाईल. पण जर अंतिम सामना जर टाय झाला. तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. येत्या टी 20 विश्वचषकापासून हे नवे नियम लागू होणार आहेत. क्रिकेटच्या सर्व सामन्यांना रोमांचक बनवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. या निर्णयाला क्रिकेट समितीनेही पाठिंबा दिला आहे.

आयसीसीच्या नियमानुसार, वन-डे आणि टी 20 सामना टाय झाला तर त्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. यात दोन्ही टीमला एक-एक अतिरिक्त ओव्हर दिली (Super Over Rule Change) जाते. ज्यात सर्वात जास्त धावा करणाऱ्या टीमला विजेता म्हणून घोषित केलं जातं. या नियमानुसार, मैदानात फलंदाजी करत असलेल्या टीमलाच सुपरओव्हरमध्ये फलंदाजी दिली जाते. तर गोलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो.

आयसीसीचा जुना नियम काय?

मात्र जर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, जे की यंदाच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये झाला. अशा परिस्थितीत चौकारांच्या आधारे निर्णय घेतला जातो. म्हणजे ज्या संघाने संपूर्ण सामन्यात जास्त चौकार मारले असतील तो विजयी ठरतो. यामध्ये संपूर्ण सामन्यासोबतच सुपर ओव्हरमधील चौकारही मोजले जातात. दरम्यान 2010 पूर्वी सुपरओव्हरचा सामना टाय झाला तर षटकार मोजले जात होते. म्हणजेच ज्या संघाने सर्वाधिक षटकार मारले असतील तो संघ विजयी घोषित केला जात होता.

ENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा?

विश्वचषकादरम्यान वाद

विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड अंतिम सामना सुरु होता. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 241 धावा काढल्या आणि इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 242 धावा करायच्या होत्या. मात्र, इंग्लंडनेही 50 षटकांत 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला.

त्यानंतर सामन्याचा निकालासाठी सुपर ओव्हर टाकण्यात आली. यामध्ये इंग्लंडने 15 धावा केल्या आणि न्यूझीलंडनेही 15 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला.

इंग्लंडने फलंदाजीदरम्यान एकूण 26 चौकार ठोकले. तर न्यूझीलंडने 17 चौकार मारले होते. त्यामुळे दोन वेळा टाय झालेल्या सामन्यात इंग्लंडला चौकारांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आलं.

सुपर ओव्हरची सुरुवात

सुपर ओव्हरची सुरुवात 2008 मध्ये टी-20 सामन्यापासून झाली होती. 2011 च्या वनडे सामन्यात सुपर ओव्हरचा समावेश करण्यात आला होता. या पूर्वी सामना टाय झाल्यानंतर बॉल आऊट करण्याचा नियम होता. बॉल आऊटमध्ये दोन्ही संघाचे पाच खेळाडू गोलंदाजी करत असत. यात गोलंदाजांना स्टंप पाडण्यासाठी प्रयत्न करत. जो संघ सर्वाधिक स्टंप पाडण्याचा प्रयत्न करेल, त्याला विजयी घोषित केले जात असे. जर बॉल आऊटमध्ये सामना टाय झाला, तर पुन्हा दोन्ही संघात बॉल आऊटचा थरार होत असे.

आयपीएलमध्ये 8 वेळा सुपरओव्हर

आतापर्यंत आयपीएलच्या सामन्यात आठ वेळा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदा 2009 मध्ये राजस्थान आणि कोलकाताच्या सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. ज्यात राजस्थानचा संघ विजयी झाला होता. तर यंदाच्या वर्षी दिल्ली आणि कोलकाताच्या सामन्यात सुपर ओव्हर झाली होती. यात कोलकात्याचा 3 धावांनी पराभव झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top