Tuesday, 26 May, 12.23 am TV9 मराठी

होम
तीन महिन्यांच्या बाळाच्या हत्येची तक्रार, आईच निघाली खुनी

जालना : जालन्यात माय-लेकाच्या नात्याला काळीमा (Three Month Old Baby) फासणारी घटना घडली. आईने पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला पाण्यात बुडवून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील अंबड येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली आहे. या घटनेनंतर शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात (Three Month Old Baby) आहे.

अंबड येथे विजय जाधव हे आपल्या पत्नी पायल जाधवसोबत राहतात. त्यांना तीन महिन्यांचं बाळ होतं. रविवारी रात्री तीनच्या सुमारास त्यांचं बाळ पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळलं. यानंतर त्या बाळाचा कुणीतरी खून केला, अशी तक्रार या बाळाच्या आईने म्हणजे पायलने पोलिसांत दाखल केली.

विशेष म्हणजे अवघ्या सहा तासांत अंबड पोलिसांनी या चिमुकल्याचा खुनाचा छडा लावला. तपासअंती बाळाच्या आईनेच त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केल्याचं समोर आलं. ही माहिती उघड येताच पोलिसांनाही धक्का बसला. आई पायल जाधवनेच आपल्या पोटच्या लेकराला पाण्याच्या टाकीत टाकून त्याचे जीवन संपवले (Three Month Old Baby).

3 महिन्यांच्या बाळाचा जीव घेण्यामागील कारण काय?

पायलचा विजयशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. तिच्या सासरचे तिला घरातून काढून टाकतील या भीतीने तिने आपल्याच पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाचा खून केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.

या निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या पथकाला मोठं यश आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत (Three Month Old Baby).

:

दरोड्यातील रक्कम नेपाळच्या माओवाद्यांना, मुंबईत दया नायक यांच्या पथकाकडून दरोडेखोराला अटक

Beed Murder | बीडमध्ये माय लेकांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, तर दुसऱ्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवलं

लातूरमध्ये क्वारंटाईन होण्यावरुन वाद, दोघांची हत्या

नांदेडमध्ये बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top