Dailyhunt
Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : अजितदादांचे पार्थिव शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात आणले

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : अजितदादांचे पार्थिव शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात आणले

TV9 Marathi 2 months ago

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी आहेत. मात्र, काही वेळातच अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी पुढे आली.

अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते शेतात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी 8 वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आज त्यांच्या चार महत्त्वाच्या निवडणूक प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते.

विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी (Landing) सज्ज झाले असतानाच अपघात झाला. कार्यकर्त्ये अजित पवार बारामतीमध्ये येणार म्हणून उत्साही होते. मात्र, यादरम्यानच हा धक्कादायक अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi