१००% अनुपालन करूनही परवाना पुन्हा बहाल न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला फटकारले आणि दंड आकारण्याचे संकेतही दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कठोर भूमिका घेत मोठा धक्का दिला आहे.
या प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने तीव्र शब्दांत टिप्पणी केली, न्यायालय म्हणाले, १००% अनुपालन दिसल्यानंतर निलंबनाचा आदेश तात्काळ रद्द करायला हवा होता. गेल्या १५ दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई याचिकाकर्त्याला कोण करणार?" असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच प्रशासकीय यंत्रणा अनेक वर्षांपासून निष्क्रिय होती आणि आता अचानक अतिसक्रियता दाखवत आहे, अशी तीव्र टीका न्यायालयाने केली. न्यायालयाने एफडीएचा निलंबनाचा आदेश तात्काळ प्रभावाने रद्द केला. तसेच, रेस्टॉरंट मालकाला गेल्या १५ दिवसांतील त्याच्या सरासरी दैनंदिन उत्पन्नाचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
वर्ध्यात स्कूल व्हॅन उलटली; अनेक विद्यार्थी जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक
Edited By- Dhanashri Naik
