Dailyhunt
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिच्या पतीवर जमीन बळकावल्याचा आरोप

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिच्या पतीवर जमीन बळकावल्याचा आरोप

पुण्यातील एका शेतकऱ्याने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बहल यांच्या विरोधात दिवाणी दावा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी चंद्रकांत बाळू शिंदे आणि त्यांच्या आई कमलबाई यांचा आरोप आहे की, त्यांनी मावळ तालुक्यातील उकसन गावातील त्यांची ३० गुंठे जमीन बेकायदेशीरपणे बळकावली आहे.

आगामी चित्रपट रामायणचा टीझर रिलीज

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ते १९४० च्या दशकापासून संरक्षित कुळ म्हणून या जमिनीवर शेती करत आहे. सोनाली बेंद्रेने हे आरोप निराधार आणि खंडणीचा प्रयत्न असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. शेतकऱ्याचा दावा आहे की, १९८० च्या दशकात कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल नोंदींमधून त्याचे नाव काढून टाकण्यात आले होते. जमिनीची खरेदी-विक्री २०१२ आणि २०२१ मध्ये झाली, ज्याला शिंदे कुटुंबाने बेकायदेशीर ठरवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.

शूटिंगदरम्यान प्रभू देवाला आला होता पक्षाघाताचा झटका; उपचार आणि विश्रांतीनंतर केले जोरदार पुनरागमन

Edited By- Dhanashri Naik
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi