महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी परिसरात शनिवारी एक मोठा रस्ते अपघात झाला. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कोंढवड गावाजवळ मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस रस्त्याच्या कडेला उलटली.
संजय शिरसाट ठाकरे यांच्या राम रक्षा आंदोलनावर टीका करत म्हणाले-आता हनुमान चालिसा आठवली
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बस उलटल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. बसच्या खिडक्या आणि दारांमधून अनेक मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात १० ते १५ मुले जखमी झाली आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, इतरांवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी परिसर सुरक्षित केला असून अपघाताचा तपास सुरू केला आहे.
तुकाराम मुंडे यांची कारवाई! दुधात भेसळ करणाऱ्यांना १० लाख रुपयांचा दंड
Edited By- Dhanashri Naik
