एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.
योगिनी एकादशी 2026: शुभ मुहूर्त, पारणाची वेळ आणि संपूर्ण पूजाविधी
याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.
Edited by - Priya Dixit
स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

