सकाळी साडे नऊच्या सुमारास अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेला झाडावरून सुखरूप खाली उतरवले. ती खाली कशी पडली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचे नाव प्रतीक्षा हिवराळे असे आहे.
या महिलेची ओळख प्रतीक्षा अंकुश हिवराळे (वय २६) अशी पटली आहे. सुटकेनंतर तिला तातडीने मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर, पुढील उपचारांसाठी तिला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
सायन हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल
जखमी प्रतीक्षा हिवराळे यांना सायन हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा यांचे अवघ्या चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेबाबत त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपत्कालीन विभागात दाखल असल्याने तिचा जबाब अद्याप नोंदवता आलेला नाही. पोलिसांनी रुग्णालयाकडून आवश्यक वैद्यकीय अहवाल (मेडिकल एंडोर्समेंट) प्राप्त केला आहे.
१० व्या मजल्यावरून खाली पडण्यामागच्या परिस्थितीचा पोलीस आता तपास करत आहेत. तिचा जबाब नोंदवल्यानंतर या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

