भारतीय पुरुष संघाने गेल्या वेळीही सुवर्णपदक जिंकले होते, तर महिला संघाने १२ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. भारतीय पुरुष संघात मानव ठक्कर, मनुष शाह, साथियान ज्ञानसेकरन, हरमीत देसाई आणि पायस जैन यांचा समावेश होता.
Commonwealth Games ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरून अस्मिता डेने इतिहास रचला
भारताने यापूर्वी गट टप्प्यात झिम्बाब्वे आणि मलेशियाला ३-० ने पराभूत केले होते. यानंतर संघाने श्रीलंका, वेल्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि इंग्लंडवर विजय मिळवला.
अंतिम सामन्यात मानव ठक्कर आणि मनुष शाह विजयी ठरले, तर साथियान ज्ञानसेकरन पराभूत झाला.
दुसऱ्या मानांकित महिला संघाने वर्चस्व गाजवत सहाव्या मानांकित मलेशियाला ३-० ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. भारतीय महिला संघात सिंड्रेला दास, श्रीजा अकुला, यशस्वी घोरपडे, सुतीर्थ मुखर्जी आणि स्वस्तिका घोष यांचा समावेश होता.
हॉकी जर्सीचे 'भगवीकरण': माजी कर्णधाराची रंगाबाबत नाराजी, वादाला तोंड फुटले
पुरुषांच्या संघाप्रमाणेच, महिला संघानेही एकही सामना न हरता स्पर्धा जिंकली. महिला संघाने मालदीव, दक्षिण आफ्रिका, नॉर्दर्न आयर्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्याविरुद्ध एकही सेट न गमावता ३-० ने विजय मिळवला. त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडलाही ३-१ ने पराभूत केले.
Edited By - Priya Dixit

