भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी जेव्हा दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने येतील, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ जेव्हा १५ ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल.
भारतीय संघाने आतापर्यंत ५९९ कसोटी सामने खेळले असून, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धचा सामना हा ६०० वा सामना असेल. भारताने स्वातंत्र्यापूर्वी आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिला सामना १९३२ मध्ये खेळला गेला. त्यावेळी भारताचे कर्णधार सी. के. नायडू होते. तेव्हापासूनचा प्रवास ऐतिहासिक राहिला आहे.
टी. दिलीप यांचा भारतीय संघासोबतचा पाच वर्षांचा प्रवास संपला, रोहित शर्मा भावूक
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी भारतीय आणि श्रीलंकन संघ आमनेसामने येतील. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार असल्याने, तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे.भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया 'अ' महिला संघाची घोषणा, मालिका तीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार
Edited By- Dhanashri Naik
