दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६३ धावा केल्या. मुंबई इंडियन्स आपला नियमित कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय खेळत होता, त्याच्या जागी कर्णधारपद भूषवणाऱ्या सूर्यकुमार यादवने ५१ धावा केल्या. रोहित शर्मानेही ३५ धावा केल्या, तर नमन धीरने २८ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने दोन बळी घेतले, तर लुंगी एनगिडी, अक्षर पटेल, विप्राज निगम आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
वैभव सूर्यवंशीने आशिष नेहराच्या पाया पडून घेतला आशीर्वाद; सर्वांची मने जिंकली
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली, केएल राहुल एक धावेवर आणि नितीश राणा खाते न उघडताच बाद झाले. त्यानंतर, समीर रिझवी आणि पथुम निस्संका यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरला. पथुम निस्संका ४४ धावा करून बाद झाला. तिथून पुढे, समीर रिझवीने वेगाने धावा करण्यास सुरुवात केली आणि दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला.
अभिषेक शर्मावर मोठी कारवाई, आयपीएलने एवढा मोठा दंड ठोठावला
समीर रिझवीच्या ५१ चेंडूंतील सात चौकार आणि सात षटकारांसह केलेल्या शानदार ९० धावांनी दिल्ली कॅपिटल्सला या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सकडून दीपक चहर, कॉर्बिन बॉश आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.Edited By - Priya Dixit

