Dailyhunt
गौरव मोरे अडकला विवाहबंधनात

गौरव मोरे अडकला विवाहबंधनात

राठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे!
त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. गौरवाने आपली मैत्रीण प्रियंका कारेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. व आता सोशल मीडियावर या जोडप्याला शुभेच्छा भेटत आहे. तसेच आणि लग्नाच्या आनंदासोबतच गौरवने आता नवीन घरातही आपले पाऊल ठेवले आहे.

तसेच अभिनेता गौरव आणि प्रियांका यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसे पहिले तर गौरवाने आजून याबाबाद काही पोस्ट केले नाही. पण गौरव मोरेची मैत्रीण प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर या जोडप्याचा फोटो शेअर केला आणि नवविवाहित या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. ऋतुजा म्हणाली, "मिस्टर आणि मिसेस मोरे, तुमच्या नवीन प्रवासासाठी आणि तुमच्या सुंदर नवीन घरासाठी अभिनंदन!

मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि जिंगल किंग विनय मांडके यांचे निधन

आता अभिनेत्रीच्या या पोस्टवरून हे दिसते की, गौरवने लग्नच केले नाही तर आता नवीन घर देखील घेतले आहे. 'महाराष्ट्री हास्य यात्रा' फेम गौरव मोरे याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. Edited By- Dhanashri Naik
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi