Dailyhunt
जबलपूरच्या धरणात पर्यटकांना घेऊन जाणारी क्रूझ उलटली, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला

जबलपूरच्या धरणात पर्यटकांना घेऊन जाणारी क्रूझ उलटली, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला

ध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध बर्गी धरणात जोरदार वादळात ३१ जणांना घेऊन जाणारी एक क्रूझ शिप उलटून बुडाली. या क्रूझ शिपमध्ये ३१ जण होते आणि आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी माहिती समोर आली आहे.

अपघात कसा घडला?
अपघाताच्या वेळी, क्रूझ शिप नर्मदा नदीच्या खोल खाडीत असलेल्या खमरिया बेटाजवळ होती. हवामान अचानक बदलले आणि जोरदार वारे वाहू लागले. उंच लाटा आणि जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे क्रूझ शिपचा तोल गेला आणि ती पाण्यात बुडाली.

अपघातानंतर लगेचच, स्थानिक खलाशी आणि प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. डायव्हर्स आणि एसडीआरएफची पथके देखील बचाव आणि मदतकार्यात गुंतलेली आहेत. रात्री सुमारे १०:३० वाजता लष्कराचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत, अंदाजे १५ जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्रात १ मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात, प्रथमच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन

बरगी धरणाजवळ क्रूझ जहाज उलटण्याच्या घटनेसंदर्भात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0761-2624355 आहे. वीरेंद्र सिंह यांची नियंत्रण कक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, हे नियंत्रण कक्ष रात्रभर कार्यरत राहील. हरवलेल्या व्यक्तींविषयी किंवा इतर महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कोणीही नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतो.

अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्रीचें कडक शब्दात वक्तव्य; "तपशील उघड झाल्यास अनेक जणांचे नावे समोर येतील''

अपघाताबाबत मुख्यमंत्री यादव काय म्हणाले?
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अपघातावर दुःख व्यक्त केले आणि शोकाकुल कुटुंबांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या.राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहे.

जबलपूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारे क्रूझ जहाज धरणात उलटले, अनेक प्रवासी बेपत्ता तर ४ जणांचा मृत्यू

Edited By- Dhanashri Naik
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi