Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?

कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?

Maharashtra Tourism : तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला २ दिवसांची (विकेंड) ट्रिप प्लॅन करायची असेल, तर महाराष्ट्रात असे अनेक पर्याय आहे जिथे तुम्ही रेल्वे किंवा एसटी बसने स्वस्तात प्रवास करून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

कमी खर्चात होणाऱ्या सर्वोत्तम ट्रिप आयडिया

इगतपुरी नाशिक

शांतता आणि धुक्यात हरवलेले डोंगर पाहण्यासाठी इगतपुरी उत्तम आहे. मुंबईहून 'पंचवटी' किंवा 'राज्यराणी' एक्सप्रेसने स्वस्तात पोहोचता येते. स्टेशनजवळ बजेट हॉटेल्स भरपूर आहे. पहिल्या दिवशी विपश्यना केंद्र आणि उंट दरी. दुसऱ्या दिवशी भावली डॅम किंवा त्रिंगलवाडी किल्ला ट्रेक.

अलिबाग रेवदंडा / नागाव

जर तुम्हाला समुद्रकिनारा आवडत असेल, तर अलिबाग हा बजेट फ्रेंडली पर्याय आहे.

मुंबईहून गेटवे ऑफ इंडिया किंवा 'भाऊचा धक्का' येथून बोटीने जा. तिथून मांडवा ते अलिबाग बसने प्रवास करा. अलिबाग मुख्य शहरापेक्षा नागाव किंवा रेवदंडा येथे स्वस्त होमस्टे मिळतात. पहिल्या दिवशी कुलाबा किल्ला आणि अलिबाग बीच. दुसऱ्या दिवशी रेवदंडा किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्स.

माथेरान कर्जत

हे भारतातील सर्वात लहान आणि 'वाहने विरहित' हिल स्टेशन आहे, त्यामुळे प्रदूषणाचा त्रास नाही. मुंबई किंवा पुण्याहून लोकलमधून कर्जतला या. तिथून टॅक्सी किंवा मिनी ट्रेनने वर जाऊ शकता. तिथे अनेक स्वस्त लॉज आणि होमस्टे उपलब्ध आहे. पहिल्या दिवशी पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट पाहा. दुसऱ्या दिवशी शार्लोट लेक आणि मार्केटमध्ये फेरफटका मारा.

लोणावळा खंडाळा सह्याद्रीची रांग

स्वस्त आणि मस्त ट्रिपसाठी हे सदाबहार ठिकाण आहे. एक्सप्रेस हायवेऐवजी जुन्या हायवेने एसटी बसने जा किंवा लोकलमधून प्रवास करा. ग्रुपने गेल्यास हॉटेलचा खर्च विभागला जातो. पहिल्या दिवशी भुशी डॅम आणि टायगर पॉइंट. दुसऱ्या दिवशी कार्ला-भाजे लेणी किंवा लोहगड ट्रेक.

भंडारदरा

तुम्हाला कॅम्पिंग आणि ताऱ्यांखाली राहायची आवड असेल, तर भंडारदरा सर्वात स्वस्त पडू शकते.स्वतःचे तंबू (Tents) नेल्यास राहण्याचा खर्च शून्य होतो, अन्यथा तिथे ग्रुप कॅम्पिंगचे पॅकेज १,००० - १,२०० रुपयांत (जेवणासह) मिळते. पहिल्या दिवशी विल्सन डॅम आणि रंधा फॉल्स. दुसऱ्या दिवशी आर्थर लेक मध्ये बोटिंग.

तोरणमाळ नंदुरबार हिल स्टेशन

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातील एक छान हिल स्टेशन आहे

शिर्डी धार्मिक ठिकाण

धार्मिक ट्रिप हवी असेल तर हे ठिकाण उत्तमआहे.

बजेट ट्रिपसाठी टिप्स-

सार्वजनिक वाहतूक: स्वतःची कार नेण्यापेक्षा रेल्वे किंवा एसटी (लाल परी) निवडा, पेट्रोलचे पैसे वाचतील.

खाद्यपदार्थ: मोठ्या रेस्टॉरंट्सऐवजी स्थानिक टपऱ्या किंवा मेसमध्ये (उदा. झुणका-भाकर किंवा घरगुती जेवण) जेवा, चवही मिळेल आणि पैसेही वाचतील.

ग्रुप ट्रिप: एकटे जाण्यापेक्षा ४-५ मित्रांच्या ग्रुपने जा, रूम आणि प्रवासाचा खर्च शेअर केल्यामुळे ट्रिप खूप स्वस्त पडते.

विकेंड ट्रिपसाठी Hidden Gems महाराष्ट्रात

तोरणमाळ नंदुरबार हिल स्टेशन

शिर्डी धार्मिक ठिकाण

धार्मिक ट्रिप हवी असेल तर हे ठिकाण उत्तमआहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi